Video: नोराच्या 'या' कृत्यामुळे संतापली आई; चक्क चप्पलेने केली अभिनेत्री धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:49 PM2022-04-22T13:49:44+5:302022-04-22T13:50:09+5:30

Nora fatehi: नोराचं एक युट्यूब चॅनेल असून यात अनेकदा ती तिच्या दैनंदिन जीवनातील व्हिडीओ अपलोड करत असते. याच तिच्या युट्यूब चॅनेलवर तिच्या आईने तिला चप्पलने मारतांनाचा व्हिडीओदेखील असल्याचं पाहायला मिळतं.

nora fatehis mother beats her with slipper actress refused to get marriage | Video: नोराच्या 'या' कृत्यामुळे संतापली आई; चक्क चप्पलेने केली अभिनेत्री धुलाई

Video: नोराच्या 'या' कृत्यामुळे संतापली आई; चक्क चप्पलेने केली अभिनेत्री धुलाई

googlenewsNext

आपल्या नृत्यशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. गेल्या कित्येक वर्षांपासून नोरा तिच्या डान्सशैलीमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे अल्पावधीत तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे नोरादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांच्या संपर्कात राहत असते. यामध्येच अलिकडे नोराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिची आई तिला चक्क चप्पलने मारताना दिसत आहे.

नोराचं एक युट्यूब चॅनेल असून यात अनेकदा ती तिच्या दैनंदिन जीवनातील व्हिडीओ अपलोड करत असते. याच तिच्या युट्यूब चॅनेलवर तिच्या आईने तिला चप्पलने मारतांनाचा व्हिडीओदेखील असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे लग्नासाठी एक स्थळ आलेलं असताना हे स्थळ नाकारल्यामुळे तिच्या आईने तिला मारलं आहे. 

या व्हिडीओमध्ये नोराची आई तिच्यामागे 'लग्न कर, लग्न कर' असा तगादा लावत आहे. मात्र, नोरा वारंवार हा प्रस्ताव फेटाळून लावत आहे. त्यामुळे अखेर कंटाळलेल्या तिच्या आईने चक्क चप्पल काढून नोराला मारण्यास सुरुवात केली. परंतु, या व्हिडीओमध्ये नोराची आई खरोखर तिला मारत नसून नोराने केलेलं हे कॉमेडी स्किट आहे. यात नोराच तिच्या आईची भूमिका साकारत आहे.

दरम्यान, नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटदेखील केल्या आहेत. आईचं सगळ्यात फेम हत्यार म्हणजे चप्पल, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, आईला इतरवेळी वेळ मिळणार नाही. मात्र, मारण्यासाठी ती नक्कीच वेगळा वेळ काढते, असं अन्य एका युजरने म्हटलं आहे.

Web Title: nora fatehis mother beats her with slipper actress refused to get marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.