नोरा फतेही म्हणतेय अंगद बेदी माझा बॉयफ्रेंड नव्हे तर मित्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 21:11 IST2017-03-19T15:41:21+5:302017-03-19T21:11:21+5:30

मॉडल तथा अभिनेत्री नोरा फतेही हिने अभिनेता अंगद बेदी याच्यासोबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. अंगद हा माझा चांगला ...

Nora Fatehi says, Angad Bedi is not my boyfriend but my friend! | नोरा फतेही म्हणतेय अंगद बेदी माझा बॉयफ्रेंड नव्हे तर मित्र!

नोरा फतेही म्हणतेय अंगद बेदी माझा बॉयफ्रेंड नव्हे तर मित्र!

डल तथा अभिनेत्री नोरा फतेही हिने अभिनेता अंगद बेदी याच्यासोबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. अंगद हा माझा चांगला मित्र असल्याचे म्हणत दोघांमध्ये सुरू असलेल्या डेटिंगच्या चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. नोरा अमेझिन इंडिया फॅशन वीक आॅटम/विंटर २०१७ मध्ये सहभागी झाली असता एका न्यूज एजन्सीशी बोलताना तिने म्हटले की, अंगद माझा चांगला मित्र आहे. आम्ही दोघेही एकमेकांना चांगले समजून घेतो. त्यामुळे अशाप्रकारच्या चर्चा निराधार आहेत. 



नोराने या फॅशन शोमध्ये डिझायनर पवन सचदेव याच्यासाठी अंगदसोबत रॅम्प वॉक केला होता. जेव्हा अंगदला नोरासोबतच्या नात्यांविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने यावर बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मात्र एक गोष्ट यावेळी प्रकर्षाने दिसत होती, ती म्हणजे अंगद आणि नोरा एकत्र रॅम्प वॉक करण्यास खूपच उत्सुक दिसत होते. याविषयी अंगदने म्हटले की, हा खरोखरच चांगला अनुभव होता. मी एका सुंदर व्यक्तीसाठी काम करीत असल्याचे समाधान वाटते. दिल्लीत परतल्यामुळे आनंद झाल्याचेही त्याने म्हटले. 



तर टीव्ही शो ‘बिग बॉस’मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नोराने म्हटले की, मी रॅम्प वॉक करण्यास खूपच उत्साहित होती. माझा मॉडलिंगचा फारसा अनुभव राहिलेला नाही. मात्र मी या गोष्टीसाठी खूश आहे की, मी इथवर पोहचली आहे. मला दिल्लीत यायला खूपच आवडते. आज दिल्लीत मला रॅम्प वॉक करण्यास मिळाल्याने मी समाधानी असल्याचेही तिने सांगितले. 

Web Title: Nora Fatehi says, Angad Bedi is not my boyfriend but my friend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.