कुणीही ‘राम’ बनायला तयार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 12:51 IST2016-08-20T07:16:49+5:302016-08-20T12:51:01+5:30

 दिग्दर्शक करण जोहर आणि रोहित शेट्टी यांनी ‘रामलखन’ चा रिमेक करण्याचे जाहीर केले. त्यानंतर राम आणि लखन यांच्या भूमिका ...

Nobody is ready to make 'Ram' | कुणीही ‘राम’ बनायला तयार नाही!

कुणीही ‘राम’ बनायला तयार नाही!

 
िग्दर्शक करण जोहर आणि रोहित शेट्टी यांनी ‘रामलखन’ चा रिमेक करण्याचे जाहीर केले. त्यानंतर राम आणि लखन यांच्या भूमिका कोण करणार? याबाबतची उत्सुकता चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनाही होती. मुख्य चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी या भूमिका केल्या आहेत.

आता रिमेकमध्ये या दोघांची भूमिका कोण करेल? याविषयी चर्चा सुरू आहे. रोहित शेट्टी सांगतात की,‘लखनच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय कुमार यांची नावे समोर येत असून रामची भूमिका करायला कोणीही तयार नाहीये.

रामलखन हा चित्रपट दोन हिरोंचा चित्रपट असून यात दोन्ही भूमिकांसाठी कलाकारांची गरज आहे. त्यामुळे सध्या रामच्या भूमिकेसाठी कोणीही तयार नसल्याने चित्रपट होल्डवर ठेवण्यात आला आहे.

ram lakhan

ramlakhan 2

Web Title: Nobody is ready to make 'Ram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.