नो रोमान्स विद रजनी!! हुमा कुरेशीला ‘या’ रोलने दिली हुलकावणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 11:22 IST2017-06-15T05:52:17+5:302017-06-15T11:22:17+5:30
ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, राधिका आपटे यांच्यासोबत रोमान्स केल्यानंतर रजनीकांत ‘काला करिकलन’ या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स ...

नो रोमान्स विद रजनी!! हुमा कुरेशीला ‘या’ रोलने दिली हुलकावणी!
ऐ ्वर्या राय, दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, राधिका आपटे यांच्यासोबत रोमान्स केल्यानंतर रजनीकांत ‘काला करिकलन’ या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार असल्याची बातमी आम्हीच तुम्हाला दिली होती. पण बातमीत थोडे ट्विस्ट आलेय. होय, रजनीकांतच्या ‘काला करिकलन’ या चित्रपटात हुमा आहे. पण ती या चित्रपटाची हिरोईन नाहीच. तामिळ इंडस्ट्रीत डेब्यू करणा-या हुमाला रजनीकांतच्या लीड अॅक्ट्रेसच्या रोलने हुलकावणी दिलीय. कारण या चित्रपटात रजनीकांतच्या ‘लव्ह इंटरेस्ट’चा रोल अभिनेत्री ईश्वरी राव करताना दिसणार आहे. हुमाचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण ती रजनीकांतसोबत रोमान्स करताना दिसणार नाही. ती यात जरीना हे पात्र रंगवणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुमा यात रजनीकांतची मदत करताना दिसणार आहे. नाना पाटेकर या चित्रपटात एका नेत्याच्या भूमिकेत आहे. या नेत्याशी लढताना जरीना रजनीकांतची मदत करणार आहे.
ALSO READ : नाशिकची अंजली पाटील सुपरस्टार रजनीकांतबरोबर ‘या’ चित्रपटातून झळकणार!
पा रंजीत दिग्दर्शित ‘काला करिकलन’ या चित्रपटात हुमा कुरेशी, नाना पाटेकर यांच्याशिवाय अंजली पाटील, संपथ, रवि काळे, सयाजी शिंदे, पंकज त्रिपाठी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पा रंजीत यांच्या ‘कबाली’ या चित्रपटातही रजनीकांत दिसला होता. या अॅक्शनपटात रजनीकांत एका डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. एक तामिळ मुलगा लहानपणी घरातून पळून मुंबईत येतो आणि मुंबईचा डॉन बनतो, असे याचे कथानक आहे. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटाची कथा अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे आधी बोलले गेले होते. मात्र धनुषने याचे खंडन केले आहे. हा चित्रपट कुठल्याही अर्थाने हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित नाही. चित्रपटाची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, असे धनुष म्हणाला होता.