ना कुणी केली सुशांत सिंग राजपूतची हत्या, ना घेतला नेपोटिझमने त्याचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 17:55 IST2020-06-16T17:52:56+5:302020-06-16T17:55:04+5:30
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सुरू असणाऱ्या नेपोटीझमचा मुद्दा चर्चेत आला आहे.

ना कुणी केली सुशांत सिंग राजपूतची हत्या, ना घेतला नेपोटिझमने त्याचा बळी
- सुभाष के. झा, वरिष्ठ पत्रकार आणि चित्रपट समीक्षक
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने सगळ्यांना धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सुरू असणाऱ्या नेपोटीझमचा हा मुद्दा चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीने सुशांतकडून काम काढून घेतले, त्याला इंडस्ट्रीत काडीची किंमत नसल्याची जाणीव आणि त्याला इंडस्ट्रीतून काढून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. करण जोहर आणि इंडस्ट्रीतील नेपोटिझमने सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असा आरोप केला.
नेपोटिझम गँगबद्दल नाट्यमयरितीने या महिलेने स्क्रीप्ट लिहित रंगवून सांगितले की सुशांतने त्याच्या कारकीर्दीत खूप चांगले काम केले आहे. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत सुशांतने इतक्या लवकर निरोप घेतला या मागचे खरे कारण लपवले जात आहे. जर सुशांत आता आपल्यात नाही. यामागे त्याला इंडस्ट्रीतून काढून टाकले हे कारण नाही. निश्चितच मी असे म्हणत नाही की सुशांत नेपोटिझमचा शिकार नव्हता. आपण सगळेच बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाही संस्कृतीला बळी पडलेलो आहे.
ज्यावेळी मी लिहायला सुरूवात केली त्यावेळी मला सांगितले गेले की तुमचे इंग्रजी खूप वाईट आहे. गोठ्यातील शाळेत शिक्षण घेतले का? असे एका संपादकाने मला विचारलं आणि स्वतःच्याच जोकवर मोठ्यामोठ्याने हसू लागला होते. त्यांनी मला गोठ्यात जाऊन गायीचे दूध काढण्याचा सल्ला दिला होता.
नेपोटिझम विरोधात लढण्यासाठी आपल्याकडे विनोदाची भावना असणे आवश्यक आहे. सुशांतकडे मुबलक प्रमाणात होती. यासोबतच त्याच्याकडे टॅलेंट आणि आत्मविश्वास होता. आम्ही बर्याचदा या गोष्टीवर हसलो. त्याच्या ‘कनेक्शनमुळे’ वारंवार भूमिका मिळत गेल्या. मला आठवतंय की एका मोठ्या स्टुडिओच्या प्रमुखाने टॅलेंट नसलेल्या अभिनेत्रीला घेतले होते. तिच्या पहिल्या चित्रपटात ती सुशांतसोबत कास्ट झाली होती. तिचे टॅलेंट कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो.
पण नेपोटिझमने त्याला कधीच कमी लेखले नाही. सुशांतला काम मिळत नव्हते यासाठी करण जोहर किंवा इतर कुणाला जबाबदार ठरवणे हे हास्यास्पद व असत्य आहे. कारण सुशांत जॉबलेस नव्हता. शेवटपर्यंत त्याच्याकडे ऑफर्स होत्या. बॉलिवूडमधील तो एकमेव अभिनेता आहे ज्याने संजय लीला भन्साळीसोबतचे तीन चित्रपट नाकारले होते. भन्साळींनी प्रथम त्याला राम लीला, नंतर बाजीराव मस्तानी आणि शेवटी पद्मावतची ऑफर दिली होती.
या चित्रपटात रणवीर सिंगने काम करून यश मिळविले. सुशांतला बॉलिवूडमध्ये एखाद्या बाहेरील व्यक्तीसारखे वाटण्यासारखे काय होते? मला असे वाटत नाही. केदारनाथ आणि छिछोरे हे त्यांचे शेवटचे दोन चित्रपट हिट झाले. त्याला सर्वोत्कृष्ट ऑफर येत होती. कोणत्याही क्षणी त्याला आऊटसायडर म्हणून टाळले गेले नाही. साजिद नाडियादवाला आणि दिनेश विजान यासारख्या मोठ्या निर्मात्यांनी वारंवार त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक होते. पण अलिकडच्या काळात सुशांतला चित्रपट निर्मात्यांची भेट घेण्यास, नवीन प्रकल्पांवर चर्चा करण्यात रस नव्हता. त्याला एकटे राहायचे होते.
इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांनी त्याला एकटे सोड नाही कारण तो चांगला काम करत नव्हता. तो चांगला काम करत होता, असं मला म्हणायचे. पण त्याला एकटेच रहायचे आहे तर त्याच्याशी आपण कसे संपर्कात राहू शकतो? आपण भेटायला सांगतो. मग आपण पुन्हा विचारतो. मग आपण सोडून देतो. सुशांतसोबत जे काही झाले त्यात कुणाचाच दोष नाही.