​‘कोई मिल गया’ची ‘ही’ बालकलाकार करणार धमाकेदार अ‍ॅक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 16:06 IST2017-12-08T10:36:23+5:302017-12-08T16:06:23+5:30

बॉलिवूडमध्ये हात आजमावून चुकलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी साऊथ इंडस्ट्रीतले एक मोठे नाव आहे. हंसिकाने नुकताच एक अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमा ...

'No Mil Gaya' 'This' child will act like a bang! | ​‘कोई मिल गया’ची ‘ही’ बालकलाकार करणार धमाकेदार अ‍ॅक्शन!

​‘कोई मिल गया’ची ‘ही’ बालकलाकार करणार धमाकेदार अ‍ॅक्शन!

लिवूडमध्ये हात आजमावून चुकलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी साऊथ इंडस्ट्रीतले एक मोठे नाव आहे. हंसिकाने नुकताच एक अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमा साईन केला आहे. यात अभिनेता अथर्वा मुरली हा हंसिकाच्या अपोझिट  दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण या चित्रपटात हंसिका जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. सॅम एंटोन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. संगीत दिग्दर्शक सॅम सीएम या चित्रपटाला संगीत देणार आहे. त्याने याआधी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाला संगीत दिले होते. येत्या १० डिसेंबरपासून हंसिकाच्या या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. तूर्तास अथर्वा आणि हंसिका या दोघांचीही साऊथच्या चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. आता हे दोघेही एकत्र येत आहेत, म्हटल्यावर चाहत्यांना उत्सुकता ही असणारच.



‘कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’ या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.अर्थात ‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता. हंसिकाच्या अशा अचानक मोठ्या होण्यावरून मग वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. लवकर मोठे होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचे याकाळात बोलले गेले होते. ‘आपका सुरूर’ आला त्याचवर्षी हंसिकाने ‘देसमुदुरू’ हा साऊथचा चित्रपट साईन केला. या चित्रपटासाठी हंसिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि या पुरस्काराने हंसिकाने साऊथ इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळवून दिली. यानंतर हंसिकाने साऊथमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपट दिलेत. 

Web Title: 'No Mil Gaya' 'This' child will act like a bang!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.