No- Makeup : विनामेकअप कॅमेºयात कैद झाली करिना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 22:59 IST2017-03-07T17:29:15+5:302017-03-07T22:59:15+5:30

आई बनलेली अभिनेत्री करिना कपूर सध्या पोस्ट डिलिव्हरी पिरियड एन्जॉय करीत आहे. ब्रांड एंडोर्समेंट, हाऊस पार्टीज याव्यतिरिक्त ती आपल्या ...

No-Makeup: Captured by Kareena Kapoor in the Unmake Camera | No- Makeup : विनामेकअप कॅमेºयात कैद झाली करिना कपूर

No- Makeup : विनामेकअप कॅमेºयात कैद झाली करिना कपूर

बनलेली अभिनेत्री करिना कपूर सध्या पोस्ट डिलिव्हरी पिरियड एन्जॉय करीत आहे. ब्रांड एंडोर्समेंट, हाऊस पार्टीज याव्यतिरिक्त ती आपल्या मित्रांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करीत आहे. गेल्या सोमवारी तिला बहीण करिष्मा कपूर व मैत्रीण अमृता अरोरा यांच्यासोबत बांद्रा येथील पाली व्हिलेज येथे स्पॉट केले होते. स्पोर्टी अंदाजमध्ये असलेली करिना विनामेकअप कॅमेºयात कैद झाल्याने तिची चांगलीच तारांबळ उडाली होती. 



विनामेकअप कॅमेºयात कैद होणारी करिना ही पहिलीच अभिनेत्री नसून यापूर्वीदेखील बºयाचशा अभिनेत्री अशाप्रकारे कॅमेºयात टिपल्या गेल्या आहेत. करिना जरी विनामेकअप असली तरी तिचा लूक बघण्यासारखा होता. ती स्पोर्टी ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि स्टनिंग दिसत होती. त्याचबरोबर तिच्यासोबत असलेल्या करिष्मा कपूर आणि अमृता अरोरा यांचाही लूक बघण्यासारखा होता. परंतु जेव्हा कॅमेरा यांच्यासमोर आला तेव्हा मात्र त्यांची तारांबळ उडाली. तिघींनीही कॅमेरा फेस करणे टाळत तेथून काढता पाय घेतला. 



काही वेळातच या तिघीही त्यांच्या कारमध्ये बसून निघून गेल्या. आई झाल्यापासून करिना माध्यमांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावताना तिच्या वाढत्या वजनावरूनही बरीचशी चर्चा रंगत आहे. अशात तिची ही झलक तिच्या फॅन्ससाठी नक्कीच हवीहवीशी असेल, यात शंका नाही. करिना लवकरच रिया कपूर हिच्या ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमामध्ये बघावयास मिळणार असून, मे महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. 



Web Title: No-Makeup: Captured by Kareena Kapoor in the Unmake Camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.