​पूर्व प्रियकरांशी मैत्री ठेवण्यात इलियानाला नाही रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 20:06 IST2016-08-11T14:36:17+5:302016-08-11T20:06:17+5:30

बॉलीवूडमध्ये एक्स-बॉयफ्रेंडसोबत मैत्री ठेवणं तशी मोठी बाब मानली जात नाही. कित्येक सेलिब्रेटी ब्रेक-अप किंवा घटस्फोटानंतर आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकर/प्रेयसीशी माधुर्याचे ...

No interest in Ilias to keep friendships with ex-lover | ​पूर्व प्रियकरांशी मैत्री ठेवण्यात इलियानाला नाही रस

​पूर्व प्रियकरांशी मैत्री ठेवण्यात इलियानाला नाही रस

लीवूडमध्ये एक्स-बॉयफ्रेंडसोबत मैत्री ठेवणं तशी मोठी बाब मानली जात नाही. कित्येक सेलिब्रेटी ब्रेक-अप किंवा घटस्फोटानंतर आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकर/प्रेयसीशी माधुर्याचे संबंध कायम ठेवतात. या बाबतीत इलियाना मात्र अपवाद ठरते.

ती म्हणते, मी कोणत्याच एक्स बॉयफ्रेंडशी मैत्री ठेवलेली नाही. प्रेमभंगानंतर मी सगळं विसरून पुढे जाणे पसंत करते. याचा अर्थ असा नाही की, मी मनात कटूता ठेवून असे करते. पण जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत असलेला स्पेशल बाँड तुटतो तेव्हा पुन्हा त्याच्याशी केवळ सामान्य मित्र म्हणून राहणे मला जमत नाही. ते मला एक प्रकारचे ओझे वाटते.

आगामी ‘रुस्तम’ चित्रपटात इलियाना विवाहबाह्य प्रेयसीची भूमिका साकारत आहे. हा रोल स्वीकारणे सर्वात मोठी जोखीम होती, असे ती सांगते. 

Web Title: No interest in Ilias to keep friendships with ex-lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.