नितीन शंकर यांचा संजय लीला भन्साळींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 22:00 IST2016-04-13T05:00:41+5:302016-04-12T22:00:41+5:30

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘दिवानी मस्तानी’ या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले. पण या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये गत ३५ वर्षांपासून ...

Nitin Shankar's Sanjay Leela Bhansali question | नितीन शंकर यांचा संजय लीला भन्साळींना सवाल

नितीन शंकर यांचा संजय लीला भन्साळींना सवाल

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘दिवानी मस्तानी’ या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले. पण या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये गत ३५ वर्षांपासून काम करणारे  सुप्रसिद्ध रिदम अरेंजर आणि प्रोग्रामर नितीन शंकर यांना एका वाईट अनुभवला सामोरे जावे लागले.  ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘दिवानी मस्तानी’  या गाण्यात नितीन शंकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र असे असूनही ‘बाजीराव मस्तानी’साठीच्या म्युझिक अवार्ड  नामांकनात नितीन यांना डावलले गेले. म्युझिक अवार्डमध्ये अरेंजर अ‍ॅण्ड प्रोग्रामर ही स्पेशल कॅटॅगिरी असताना नामांकनातून नितीन शंकर यांचे नावचं गाळण्यात आले. हा अक्षम्य निष्काळजीपणा लक्षात आणून दिल्यानंतरही कमालीची सारवासारव करण्यात आली. अवार्डसाठी तुमचे नाव पुकारण्यात आले, पण तुम्ही उपस्थित नव्हता, असे शंकर यांना सांगण्यात आले. हेही थोडे की काय, म्हणून अवार्ड विनिंग लिस्टमध्ये ‘अ‍ॅडिशनल प्रोग्रामर’ म्हणून नितीन यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. या संपूर्ण अन्यायकारक वागणुकीविरूद्ध नितीन शंकर यांनी आवाज उचलला. एक पत्रपरिषद घेऊन,विविध अवार्ड शोचे आयोजक आणि ज्युरिंंच्या या वागणुकीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. शिवाय  ‘बाजीराव मस्तानी’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही जाहिर प्रश्न केला आहे. हाच प्रकार माझ्याऐवजी दीपिका, रणवीर वा प्रियंकाबाबत घडला असता तर तुम्हाला चालला असता का? हा सवाल त्यांनी भन्साळींना केला आहे. यासंदर्भात खुद्द नितीन शंकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या एकूणच प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला. 
 

अपमान मी का खपवून घेऊ? 
माझ्यासाठी अवार्ड महत्त्वाचा नाही तर माझे कष्ट आणि त्या कष्टाचा मोबदला महत्त्वाचा आहे. दुसरा कुठलाही चित्रपट असता तर मी दुर्लक्ष केले असते. पण हा प्रकार ‘बाजीराव मस्तानी’बद्दल घडला. ‘बाजीराव मस्तानी’ पुन्हा घडणे नाही, त्यामुळेच मला मिळालेली वागणूक मला माझ्यावरचा अन्याय वाटतो आहे. ‘दिवाणी मस्तानी’गाण्यात माझा सिंहाचा वाटा असताना, चित्रपटाच्या क्रेडिटमध्ये अरेंजर व प्रोग्रामर असे माझे नाव असताना अवार्डच्या नामांकनात माझे हे क्रेडिट इतरांना दिले जात असेल तर मी गप्प कसा राहू? असा सवाल नितीश यांनी केला. मी यावर आक्षेप नोंदवल्यावर त्यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट लिहून तुमच्या अनुपस्थितीत तुम्हाला या पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे जाहिर करून टाकले. त्यांच्याकडे माझा संपर्क आहे, पण अवार्ड देण्याआधी त्यांनी मला याबाबत माहिती द्यायची जराही तसदी घेतली नाही. मला एका मला एका ओळीनेही कळवले नाही. याऊपरही कळस म्हणजे, त्यांच्या वेबसाईटवरील अवार्ड विनिंग लिस्टमध्ये त्यांनी मला ‘अ‍ॅडिशनल प्रोग्रामर’ म्हणून दाखवले. हा माझा अपमान आहे. एका ‘अरेंजर’ला तुम्ही ‘अ‍ॅडिशनल प्रोग्रामर’ म्हणत असाल तर हा निष्काळजीपणा, हा अपमान मी का खपवून घेऊ? म्युझिक अवार्डचे ज्युरी, ग्रूप, पॅनलची हीच ती विश्वासार्हता का?

भन्साळी साहेब, हे दीपिका, रणवीरबद्दल घडले असते तर तुम्ही शांत राहिले असता का?
भन्साळींना माझा या चित्रपटातील योगदान माहिती आहे. त्यामुळेच माझ्याबाबत जे घडले, तेच दीपिका, रणवीर वा प्रियंकाबाबत घडले असते तर ते शांत राहिले असते का? असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे.




      दिवगंत आर.डी बर्मन यांच्यासह जतीन ललीत, अनु मलिक, इस्माईल दरबार, आनंद राज आनंद अशा अनेक म्युझिक डायरेक्टरसोबत नितीन शंकर यांनी         काम केले आहे. नामवंत गायिका आशा भोसले, अनु मलिक, साजिद (साजिद -वाजिद) यानी नितीन यांना समर्थन दिले आहे.

Web Title: Nitin Shankar's Sanjay Leela Bhansali question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.