रातोरात सुपरस्टार झालेल्या ‘या’ अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहत्यांना खाव्या लागल्या पोलिसांच्या काठ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 17:39 IST2017-08-23T12:09:40+5:302017-08-23T17:39:40+5:30

८० आणि ९० च्या दशकात बरेचसे असे चित्रपट आले ज्यामधील कलाकार रातोरात सुपरस्टार झाले. चाहते त्यांची एक झलक बघण्यासाठी ...

Nightclub police stations to meet the 'superstar' night actress! | रातोरात सुपरस्टार झालेल्या ‘या’ अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहत्यांना खाव्या लागल्या पोलिसांच्या काठ्या!

रातोरात सुपरस्टार झालेल्या ‘या’ अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहत्यांना खाव्या लागल्या पोलिसांच्या काठ्या!

आणि ९० च्या दशकात बरेचसे असे चित्रपट आले ज्यामधील कलाकार रातोरात सुपरस्टार झाले. चाहते त्यांची एक झलक बघण्यासाठी अक्षरश: आतुर व्हायचे. ‘नदिया के पार’ हा चित्रपटातही त्याच श्रेणीतला ठरला. चित्रपटाने अभिनेत्री साधना सिंग हिला नवी ओळख निर्माण करून दिली. राजश्री प्रॉडक्शनच्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर प्रचंड यश मिळविले. उत्तर प्रदेशातील छोट्याशा जौनपूर गावातील चित्रपटातील कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली. मात्र तुम्हाला माहीत आहे काय की, चित्रपटात गुंजाची भूमिका साकारणाºया साधना सिंग हिला अभिनेत्री व्हायचे नव्हते. ती अपवादाने या क्षेत्रात आली. 

त्याचे झाले असे की, एक दिवस साधना कुठल्यातरी चित्रपटाची शूटिंग बघण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्यावर दिग्दर्शक सुरज बडजात्या यांची नजर गेली. साधनाला बघताच सुरज यांनी निर्णय घेतला की, त्यांच्या पुढच्या चित्रपटाची हिरोईन साधना असेल. जेव्हा सुरज बडजात्या साधना सिंग हिच्याकडे चित्रपटाची आॅफर घेऊन गेले, तेव्हा तिने सुरुवातीला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर तिला लोकांनी समजावून सांगितल्यानंतर तिने होकार दिला. त्यानंतर जे काही घडले ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. साधनाचा ‘नदिया के पार’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. शिवाय या चित्रपटात काम करणाºया प्रत्येक कलाकाराला एक स्वतंत्र ओळख मिळाली. 



या चित्रपटानंतर साधनाकडे बºयाचशा चित्रपटांच्या आॅफर येण्यास सुरुवात झाली. चाहते तर तिची एक झलक बघण्यासाठी आतुर असायचे. तिला बघण्यासाठी अक्षरश: चाहत्यांच्या रांगा लागायच्या. बºयाचदा तर असे झाले होते की, साधनाला पाहण्याच्या नादात चाहत्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या. बºयाचशा कमी लोकांना माहिती आहे की, साधनाला अभिनयाबरोबरच गायनाचीही प्रचंड आवड आहे. 

‘नदिया के पार’ या चित्रपटातील साधनाची ‘गुंजा’ ही भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. बºयाच लोकांनी तर त्यांच्या मुलींचे नाव ‘गुंजा’ असे ठेवण्यास सुरुवात केली होती. ‘नदिया के पार’ या चित्रपटानंतर साधनाने ‘ससुराल, तुलसी, औरत और पत्थर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. खूपच कमी काळात साधनाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळाले. मात्र अशातही ती काही काळानंतर बॉलिवूडमधून गायब झाली. लग्न केल्यानंतर ती तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त झाली. 

Web Title: Nightclub police stations to meet the 'superstar' night actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.