निकनेम्स..लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:28 IST2016-01-16T01:14:35+5:302016-02-06T10:28:56+5:30
करिना, करिश्मा, गोविंदा यांची टोपणनावे तर आपल्याला माहिती आहेत. पण आजचे आघाडीचे कलाकार ज्यांनी आपल्या अभिनयाने अख्ख्या जगाला भूरळ ...

निकनेम्स..लय भारी!
रिना, करिश्मा, गोविंदा यांची टोपणनावे तर आपल्याला माहिती आहेत. पण आजचे आघाडीचे कलाकार ज्यांनी आपल्या अभिनयाने अख्ख्या जगाला भूरळ घातली. त्यांची टोपणनावे अनेकांना माहिती नाहीत. कोणकोण आहेत या यादीत आणि काय आहेत त्यांची नावे बघा जरा..
श्रद्धा कपूर
'एबीसीडी २' मधील श्रद्धाच्या डान्स मुव्हजच्या अनेकजण प्रेमातच पडले. वरूण धवन श्रद्धाचा बालमित्र असल्याने ती केमिस्ट्री आणि मुव्ह्ज तिच्यामध्ये दिसली. चित्रपटांत रोमान्स करताना श्रद्धाला अनेक टोपणनाव मिळाले. पण तिचा खर्या आयुष्यातील बालमित्र वरुण तिला चिरकूट या नावाने बोलवतो.
ऐश्वर्या राय बच्चन
आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने 'जज्बा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. बच्चन परिवाराची सून, माजी मिस वर्ल्ड असलेली ऐश्वर्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवरून मार्गस्थ झाली. बॉलिवूड जगताला मात्र ऐश्वर्याला केवळ 'अँश' म्हणायला आवडते. पण तिचे खरे टोपणनाव 'गुल्लू' आहे. खरंतर हे ऐकायला खूपच फनी वाटते. पण, घरची मंडळी ऐशला गुल्लू म्हणतात हे अगदी खरे आहे.
कंगना राणावत
'द क्वीन ऑफ बॉलिवूड' कंगणा ही तिच्या पॉवरफुल आणि नितांत सुंदर सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिला खरंतर कंगना हे अतिशय सुंदर नाव आहे. या हिंदी शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे 'बांगड्या' असा होतो. खरंतर तिचे टोपण नाव हे एका मुलाचे आहे. तिचे कुटुंबीय तिला 'अर्शद' या नावाने बोलावतात. अर्शद म्हणजे भक्ती.
आलिया भट्ट
बॉलिवूडची रायजिंग स्टार आलिया भट्ट तिच्या अमेझिंग परफॉर्मंसमुळे दिवसेंदिवस सर्वांची चाहती होत आहे. खरंतर तिचे आलिया हे नाव शॉर्ट आहे. पण तिचे कुटुंबीय तिला 'अल्लू' नावाने बोलावतात. अल्लू हे टोपणनाव 'आलिया' या नावावरून पडले नसून तिच्या गोबर्या गालांवरून पडले असल्याचे कळते.
रणबीर कपूर
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजे रणबीर कपूरला घरात सर्वजण 'डब्बू' म्हणतात. पण त्याच्या आईने त्याच्यासाठी एक वेगळे आणि फनी नाव ठेवले आहे. नीतू सिंग तिच्या लाडक्या मुलाला 'रेमंड' म्हणणे पसंत करते. कारण तिला वाटते की, तो एक कम्प्लिट माणूस आहे. खूपच इंटरेस्टिंग आणि लव्हली टोपणनाव आहे हे हो ना..?
सोनम कपूर
बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये फॅशनचा प्रचंड सेन्स असलेली सोनम कपूर 'फॅशनिस्टा' म्हणून ओळखली जाते. ती एकदम स्लिम ट्रीम असून तिची उंची देखील बरीच आहे.म्हणून की काय तिला तिचे वडील अनिल कपूर 'जिराफे' नावाने बोलावतात.