निक जोनासचे नवे गाणे ‘Right Now’ झाले रिलीज, प्रियांका चोप्रापासून प्रेरीत आहे हे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 17:35 IST2018-08-25T17:34:57+5:302018-08-25T17:35:57+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड निक जोनासचा नवे सिंगल गाणे राइट नाऊ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रियांका चोप्रापासून प्रेरीत होऊन बनवल्याचे बोलले जात आहे.

Nick Jonas's new song 'Right Now' inspired by Priyanka Chopra | निक जोनासचे नवे गाणे ‘Right Now’ झाले रिलीज, प्रियांका चोप्रापासून प्रेरीत आहे हे गाणे

निक जोनासचे नवे गाणे ‘Right Now’ झाले रिलीज, प्रियांका चोप्रापासून प्रेरीत आहे हे गाणे

ठळक मुद्देप्रियांका व निकच्या लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही.


बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड निक जोनास याचे राइट नाऊ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे प्रियांकापासून प्रेरीत होऊन बनवले असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. यु आर माय वॉटर, माय सन, माय मून अॅण्ड स्टार्स... यु्अर हार्ट इज ऑल आय नीड... आय वॉन्ट टू बी वेअर यु आर, वेअर यु आर... असे या गाण्याचे बोल आहेत. निकने हे गाणे जर्मन म्युझिशियन रॉबिन स्कूल्जसोबत बनविले आहे.


निक जोनास साखरपुडा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच युएसला जायला रवाना झाला होता. १८ जुलैला प्रियांकाच्या वाढदिवसादिवशी निकने प्रियंकासोबत एगेंजमेंट केल्याचे बोलले जात होते आणि एक महिन्यानंतर १८ ऑगस्टला दोघांनी साखरपुडा केला आणि ऑफिशियल रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले. साखरपुड्यानंतर प्रियांका मुंबईतल्या घरी तिच्या मित्र परिवारासाठी पार्टीचे देखील आयोजन केले होते. 
निक आणि प्रियांकाच्या लग्नाची तारीख अद्याप समजू शकलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी सांगितले की, निक आणि प्रियांकाच्या लग्नाबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. प्रोफेशनल पातळीवर ते दोघे त्यांची ठरलेली कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.
प्रियांका आणि निकने आपल्या लग्नासाठी एका खास शहराची निवडदेखील केली आहे. प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न समुद्राच्या कुशीत वसलेल्या हवाईला दोघांनीही पसंती दिली आहे. निकला समुद्र प्रचंड आवडतो. त्यामुळे याचठिकाणी हे जोडपे लग्नगाठ बांधेल, याची शक्यता अधिक आहे. हे लग्न कसे होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. पण हा सोहळा पारंपारिक हिंदू पद्धतीने होईल, असे मानले जात आहे.  

Web Title: Nick Jonas's new song 'Right Now' inspired by Priyanka Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.