दीपिकाचा ‘एक्सएक्सएक्स ३’ प्रदर्शनाला नववर्षाचे मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:52 IST2016-02-25T11:52:00+5:302016-02-25T04:52:00+5:30
‘एक्सएक्सएक्स: द रिटर्न आॅफ जैंडर केज’ या पहिल्या वहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणात दीपिका पादुकोण सध्या व्यस्त आहे. कॅनडाच्या टोरंटो ...

दीपिकाचा ‘एक्सएक्सएक्स ३’ प्रदर्शनाला नववर्षाचे मुहूर्त
‘ क्सएक्सएक्स: द रिटर्न आॅफ जैंडर केज’ या पहिल्या वहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणात दीपिका पादुकोण सध्या व्यस्त आहे. कॅनडाच्या टोरंटो येथे या अॅक्शनपटाचे चित्रीकरण सुरु आहे. भारतातील तिचे चाहते तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूड चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र तिच्या चाहत्यांना पुढील वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण दीपिकाचा हॉलिवूडपट पुढील वर्षी २० जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता विन डीझेलसोबत दिसणार आहे. पॅरामाऊंट पिक्चर्सने ‘एक्सएक्सएक्स’च्या तिसºया सिक्वेलच्या अमेरिकेतील रिलीजच्या तारखांची घोषणा केली आहे. २००५ मध्ये ‘एक्सएक्सएक्स : स्टेट आॅफ द यूनियन’ पहिला चित्रपट आला होता.