‘ब्रेक-अप’ साँगचा नवा अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:23 IST2016-10-14T10:23:49+5:302016-10-17T11:23:32+5:30

या गााण्यात रणबीर-अनुष्का एकदम कुल दिसत आहेत़ तेव्हा पाहूयात ब्रेकअपचा हा नवा अर्थ रसिकांना कितपत आवडतोय ते!

A new version of 'break-up' song! | ‘ब्रेक-अप’ साँगचा नवा अंदाज!

‘ब्रेक-अप’ साँगचा नवा अंदाज!

्तापर्यंतच्या अनेक चित्रपटांमधून ‘ब्रेक-अप’चा अर्थ उलगडला.  ‘ब्रेक-अप’नंतरचा विरह, एकमेकांच्या आठवणीत अश्रू ढाळणारे नायक-नायिका आपण अनेक चित्रपटांत बघितले़ केवळ चित्रपटांतच नाही तर आपल्या अवती-भवतीही अशी अनेक ‘ब्रेक-अप’ आपण पाहिलीत, पाहतोय़

पण, खरे सांगायचे तर आता काळ बदललायं. ‘ब्रेक-अप’नंतरचे अश्रू वगैरे सगळं संपलयं.  होय, आता अश्रू वगैरे विसरा आणि सज्ज व्हा ‘ब्रेक-अप’चा नवा अर्थ समजून घेण्यासाठी. ‘ऐ दिल हैं मुश्किल’च्या माध्यमातून ‘ब्रेक-अप’चा नवा अर्थ उलगडलाय. ‘ब्रेक -अप’ म्हणजे ‘रोना-धोना’ नव्हे तर मज्जा, मस्ती आणि धम्माल...

‘द ब्रेक अप साँग’ यात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे त्यांचं एकमेकांपासून वेगळं होणं सेलिब्रेट करतांना दिसतायेत. अमिताभ भट्टाचार्यांनी गाण्याचे शब्द रचले असून प्रितम यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. अरिजित सिंग आणि जोनिता गांधी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेल्या या गााण्यात रणबीर-अनुष्का एकदम कुल दिसत आहेत़ तेव्हा पाहूयात ब्रेकअपचा हा नवा अर्थ रसिकांना कितपत आवडतोय ते!


 

Web Title: A new version of 'break-up' song!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.