बॉक्सआॅफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडत दंगल चित्रपटाचा नवा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 18:39 IST2017-01-09T18:39:51+5:302017-01-09T18:39:51+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्या दंगल या चित्रपटाने बॉक्सआॅफीसवर बाजी मारली आहे. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर नवा विक्रम ...
बॉक्सआॅफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडत दंगल चित्रपटाचा नवा विक्रम
ब लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्या दंगल या चित्रपटाने बॉक्सआॅफीसवर बाजी मारली आहे. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर नवा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या बरजरंगी भाईजान या चित्रपटाचा विक्रम मोडित काढत आमीर खानच्या पीके या चित्रपटाला ही मागे टाकत दंगल हा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याचा मान दंगल या चित्रपटाला मिळाला आहे. आतापर्यंत हा विक्रम आमीरच्या पीके चित्रपटाच्या नावावर होता. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या पीके या चित्रपटाची एकूण कमाई ३४०.८ कोटी रुपये इतकी आहे. मात्र दंगल चित्रपटाने ३४५.३ कोटी रुपयांचा गल्ला जमवत अवघ्या १७ दिवसात हा विक्रम मोडित काढला आहे. दंगल हा चित्रपट 23 डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भारतात ४ हजार ३००, तर देशाबाहेर एक हजार स्क्रीन्सवर झळकला होता. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या काळातही चित्रपटाने इतकी घसघशीत कमाई केली आहे. परदेशातील आकडेवारी पाहता ५०० कोटींचा गल्ला पार झाला आहे.
महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या कुस्तीपटू होण्याच्या प्रवासावर बेतलेल्या या चित्रपटाने ३४० कोटींची कमाई करत आता ३५० कोटी रुपयांच्या कमाईची वाट धरली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही त्यांनी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा जाहिर केला आहे.
दंगलने सलमान खानच्या सुलतान या चित्रपटाचा देशांतर्गत बॉक्स आॅफिस कमाईचा म्हणजेच ३०१ कोटींचा विक्रम पार केला असून, जवळपास इतर सर्वच चित्रपटांवर मात करत बाजी मारली आहे.
चित्रपटाला मिळालेल्या या घवघवीत यशामुळे आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि संपूर्ण दंगलची टीमच उत्साहात असणार यात शंकाच नाही. काही दिवसांपूर्वीच आमिरने हे स्पष्ट केले होते की, त्याला बॉक्स आॅफिस कमाईचे आकडे जास्त महत्त्वाचे नाहित. मी कमाईच्या आकड्यापेक्षा प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांना जास्त महत्त्व देतो. मला त्या आकड्यांमध्ये काहीही रस नाही. प्रेक्षकांची मनं जिकणं हाच माज्या चित्रपटांचा मुख्य हेतू असतो.
{{{{twitter_post_id####
दंगल या चित्रपटाने हे सर्व चित्रपट मागे टाकत बॉक्सआॅफिसवर बाजी मिळवली.
![]()

}}}}2016 was a landmark year for Disney India. Highest grossers ever:- Hindi: #Dangal [₹ 345.30 cr], Hollywood: #TheJungleBook [₹ 188 cr nett].— taran adarsh (@taran_adarsh) January 9, 2017
दंगल या चित्रपटाने हे सर्व चित्रपट मागे टाकत बॉक्सआॅफिसवर बाजी मिळवली.