‘पद्मावती’समोर नवी अडचण : दीपिका, शाहिदसाठी काय काढणार तोडगा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 20:47 IST2016-11-23T20:47:27+5:302016-11-23T20:47:27+5:30
बॉलिवूड चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या जाणाºया ‘पद्मावती’मध्ये अडचणींची मालिका सुरूच आहे. या चित्रपटाची शूटिंग ...

‘पद्मावती’समोर नवी अडचण : दीपिका, शाहिदसाठी काय काढणार तोडगा?
‘पद्मावती’मध्ये दीपिका पादुक ोण ही मुख्य भूमिकेत असून तिचा पती राजा रतन सिंग ही भूमिका शाहिद कपूर साकारतो आहे. मात्र या जोडीमुळे दिग्दर्शख संजय लीला भंसाळी यांच्या समोर नवी अडचण निर्माण झाली आहे. मीडियात येत असलेल्या बातम्यानुसार, दोघांनी या चित्रपटासाठी टेस्ट लूक दिला होता. तेव्हा ही जोडी फायनल करण्यात आली होती. मात्र दीपिकाची उंची शाहिदपेक्षा जास्त आहे. चित्रपटातील भूमिकांचा विचार केला तर ते योग्य नाही.
दिग्दर्शक भंसाळी यांच्या मते, जुण्या काळातील राजे आपल्या राण्याच्या तुलनेत उंच असायचे. हा विचार केला तर या दोघांची जोडी यात फिट ठरत नाही. आता भंसाळी यांना शाहिदची उंची वाढविण्यासाठी नवे पर्याय शोधावे लागणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील डिझायनर रिंपल आणि हरप्रीत नरुला हे दीपिका व शाहिदचे कॉस्च्युम डिझाईन करीत आहेत. आता शाहिदची उंची वाढविण्यासाठी डिझायनर्सचा कस लागणार आहे.
पद्मावतीला सुुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करीत आहे. शाहिद कपूर व रणवीर सिंग यांच्यात असलेल्या कास्टिंगवरून वाद झाल होता. यानंतर चित्रपटाच्या बजेटमुळे इरोसने आपले हात मागे घेतले. त्यानंतर स्क्रिप्ट बदलण्याचा आग्रह रणवीर धरला, हा वाद शांत झाला तोच शाहिदने आपल्या कामात कुणाचीच ढवळाढवळ नको असा दमच भंसाळी यांना दिला होता असेही सांगण्यात येते. आता शूटिंग सुरू झाली तर पुनह एक नवी अडचण निर्माण झाली आहे. आता पाहुया यातून भंसाळी काय मार्ग काढतात.