चांगल्या गाण्याची वाट लावली! 'बॅड न्यूज'मधील 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्यावर भडकले नेटकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 17:52 IST2024-07-14T17:51:45+5:302024-07-14T17:52:01+5:30
विकी कौशल - तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' मधील नव्या गाण्यावर भडकले नेटकरी (bad newz)

चांगल्या गाण्याची वाट लावली! 'बॅड न्यूज'मधील 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्यावर भडकले नेटकरी
विकी कौशल - तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'बॅड न्यूज' मध्ये विकी-तृप्तीची अनोखी केमिस्ट्री बघायला मिळतेय. 'बॅड न्यूज' सिनेमातील याआधीची 'तौबा तौबा' आणि 'जानम' ही दोन्हीही गाणी प्रेक्षकांमध्ये चांगलीच हिट झाली. तौबा तौबा हे गाणं आणि त्यावरील विकीच्या स्टेप्स इंटरनेटवर चांगल्याच व्हायरल झाल्यात. आता याच सिनेमातील मेरे मेहबूब मेरे सनम हे गाणं रिलीज झालंय. शाहरुख खानच्या डुप्लिकेट सिनेमातील गाजलेल्या गाण्याचं हे रिमेक वर्जन आहे. पण हे गाणं ऐकताच नेटकऱ्यांंमध्ये नाराजी निर्माण झालीय.
मेरे मेहबूब मेरे सनम गाण्यावर नाराजी
तृप्ती डिमरीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 'मेरे मेहबूब मेरे सनम' या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये पाहिल्यास हे गाणं लोकांना पसंत नसल्याचं दिसून येतंय. एका यूजरने लिहिलंय की, "गाणे चांगलंच खराब झालं आहे." आणखी एका युजरने लिहिले की, "आणखी एका क्लासिक गाण्याची वाट लावली आहे." आणखी एका यूजरने लिहिले की, "जुनी गाणी खराब करू नका. तुमची स्वतःची नवीन गाणी बनवा." अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली.
मेरे मेहबूब मेरे सनम ओरिजीनल गाण्याबद्दल
'मेरे मेहबूब मेरे सनम' हे गाणं शाहरुख खान, जुही चावला आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'डुप्लिकेट' सिनेमातील याच नावाच्या गाण्याचा रिमेक आहे. मूळ गाणे हिट ठरले आणि आजही लोक ते गाणे ऐकतात. मात्र मूळ गाण्याचा रिमेक लोकांना आवडला नाही. दरम्यान विकी कौशल - तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' सिनेमा १९ जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. टीझर, ट्रेलर आणि गाण्यानंतर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.