'नाइटी घालून आली', म्हणत नेटकऱ्यांनी करीना कपूरला केलं चांगलंच ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:12 IST2021-11-22T15:11:45+5:302021-11-22T15:12:14+5:30
करीना कपूर खान नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यावेळी तिने परिधान केलेल्या आउटफिटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

'नाइटी घालून आली', म्हणत नेटकऱ्यांनी करीना कपूरला केलं चांगलंच ट्रोल
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकतेच तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावेळी तिला तिच्या आउटफिटमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
करीना कपूर खान नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यावेळी तिने ब्लॅक रंगाचा जाळीदार टॉप परिधान केला होता. त्याचा लूक नाइटीसारखा होता. त्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले. तिने नेट नेकलाइन असलेल्या टॉपमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या. त्यानंतर तिला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
करीना कपूर खानचा हा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एका इंटरनेट युजरने कमेंट करत लिहिले की, हे स्टार्स किती श्रीमंत असतात पण त्यांच्याकडे कपडे नसतात.
दुसऱ्या एका युजरने म्हटले की, नाइट घालून आली. आता यांचे स्टायलिश फाटलेले कपडेदेखील संपले. प्रभू, आणखी काय काय दाखवणार. आणखी एका युजरने लिहिले की, पहा आता बेबी डॉल नाइटी पण टॉप सारखी परिधान करून आली. ही इतकी गरीब तर नाही आहे की एकच आउटफिट वेगवेगळ्या पद्धतीने परीधान करेल.
करीना कपूर दिसणार लाल सिंग चड्ढामध्ये
करीना कपूर खानच्या आगामी वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच लाल सिंग चड्ढा चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत आमीर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.