ना सनी, ना बॉबी नाही धर्मेंद्र; देओल कुटुंबातील 'हा' व्यक्ती आहे सर्वात श्रीमंत, जाणून घ्या संपूर्ण देओल कुटुंबाची नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 12:27 PM2024-02-09T12:27:19+5:302024-02-09T12:27:57+5:30

Deol Family Net Worth:२०२३ हे वर्ष देओल कुटुंबासाठी खूप चांगलं ठरलं आहे. सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र, यांच्या सर्वांच्या सिनेमांनी चांगला बिझनेस केला आहे. मात्र या तिघांपेक्षा देओल कुटुंबातील हा सदस्य सर्वात जास्त श्रीमंत आहे.

Neither Sunny nor Bobby nor Dharmendra; 'This' person in Deol family is the richest, know the net worth of entire Deol family | ना सनी, ना बॉबी नाही धर्मेंद्र; देओल कुटुंबातील 'हा' व्यक्ती आहे सर्वात श्रीमंत, जाणून घ्या संपूर्ण देओल कुटुंबाची नेटवर्थ

ना सनी, ना बॉबी नाही धर्मेंद्र; देओल कुटुंबातील 'हा' व्यक्ती आहे सर्वात श्रीमंत, जाणून घ्या संपूर्ण देओल कुटुंबाची नेटवर्थ

जेव्हा कधी देओल कुटुंबाचं (Deol Family) नाव घेतलं जातं तेव्हा सर्वात आधी सनी देओल(Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांचं नाव डोक्यात येतं. सर्वांची कमाई वेगवेगळी आहे आणि त्यांची नेटवर्थही. २०२३मध्ये सनी देओलचा गदर २, बॉबी देओलचा अॅनिमल, धर्मेंद्र यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी रिलीज झाला आहे. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. २०२३मध्ये तिन्ही देओल चर्चेत आले मात्र कमाईच्या बाबतीत या तिघांपेक्षा दुसरा देओल पुढे आहे.

धर्मेंद्र यांना दोन मुले असून दोघेही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. सनी देओलची दोन मुलं करण आणि राजवीर देओल या दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. धर्मेंद्र यांचा भाऊ अजित देओल यांचा मुलगा अभय देओलही चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. जर आपण देओल कुटुंबातील पुरुष सदस्यांबद्दल बोललो तर ते सर्व चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत परंतु अभय देओल त्यापैकी सर्वात श्रीमंत आहे. 

देओल कुटुंबाची एकूण संपत्ती किती आहे?
देओल कुटुंबात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल, राजवीर देओल, करण देओल आणि अभय देओल चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. या सर्वांची कमाई वेगळी आहे आणि त्यांची स्वतःची संपत्ती देखील आहे. 

धर्मेंद्र: धर्मेंद्र यांनी ६०च्या दशकात पदार्पण केले आणि अजूनही ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. वयाच्या ८८ व्या वर्षीही धर्मेंद्र चित्रपट करत आहेत. डीएनए इंडियाच्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांची जवळपास ३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यापैकी त्यांचे लोणावळ्यात १०० कोटी रुपयांचे फार्महाऊस आहे.

सनी देओल: सनी देओलने ८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अजूनही तो चांगले चित्रपट करत आहे. त्याचा गदर २ हा चित्रपट ऑगस्ट २०२३ मध्ये आला जो ब्लॉकबस्टर ठरला. त्यावेळी बातमी अशी होती की सनी देओलने या चित्रपटासाठी २० कोटी रुपये फी घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर सनी देओलची संपत्ती १५० कोटी रुपये आहे.

बॉबी देओल: बॉबी देओलने ९० च्या दशकात पदार्पण केले होते परंतु त्याचे नशीब आता ओटीटी आणि बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकेत फळफळले आहे. ॲनिमल या चित्रपटातील त्याची भूमिका खूप आवडली होती ज्यासाठी त्याला ३ ते ५ कोटी रुपये मानधन मिळाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओलची एकूण संपत्ती ७० कोटी रुपये आहे.

अभय देओल: अभय देओलने २००९ मध्ये देव डी या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर त्याने अनेक चित्रपट केले आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याची एकूण संपत्ती सुमारे ४०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ सर्व देओलमध्ये अभय देओल सर्वात श्रीमंत आहे.

करण देओल: करण देओलने २०१९ मध्ये पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट फारसा चालला नाही आणि आत्तापर्यंत करणने काही चित्रपट केले पण ते हिट झाले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण देओलची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे.

राजवीर देओल: सनी देओलला करण आणि राजवीर अशी दोन मुले आहेत आणि राजवीर लहान आहे. राजवीरने २०२३ मध्ये पदार्पण केले आहे आणि आतापर्यंत त्याची एकूण संपत्ती २५ ते ३० कोटी इतकीच आहे. 

Web Title: Neither Sunny nor Bobby nor Dharmendra; 'This' person in Deol family is the richest, know the net worth of entire Deol family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.