नील नितीन मुकेशने मुलीचे नाव ठेवले नुरवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:58 IST2018-09-22T17:57:54+5:302018-09-22T17:58:24+5:30

अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी यांना काही दिवसापूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आता नीलने मुलीच्या नावाची घोषणा ट्विटरवर केली आहे. त्याने मुलीचे नाव नुरवी ठेवले आहे.

Neil Nitin Mukesh named the girl Nurvi | नील नितीन मुकेशने मुलीचे नाव ठेवले नुरवी

नील नितीन मुकेशने मुलीचे नाव ठेवले नुरवी

ठळक मुद्देनील नितीन मुकेश आणि रुक्मिणी यांनी मुलीचे नाव ठेवले नुरवी


अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी यांना काही दिवसापूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले. आता नीलने मुलीच्या नावाची घोषणा ट्विटरवर केली आहे. त्याने मुलीचे नाव नुरवी ठेवले आहे.

नीलने ट्विटरवर लिहिले की, रुक्मिणी आणि मला आमची मुलगी नूरवी हिच्या जन्मामुळे अभिमानास्पद वाटत आहे. संपूर्ण मुकेश परिवार आनंदात आहे. ईश्वर कृपेने मुलगी आणि आई सुखरुप आहेत.


रुक्मिणी यांनी गुरुवारी बीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. नीलने एप्रिल महिन्यात बाप होणार असल्याची घोषणा इन्स्टाग्रामवर केली होती. 

 ९ फेबु्रवारी २०१७ रोजी नील आणि रूक्मिणी विवाहबंधनात अडकले होते. राजस्थानच्या उदयपूर येथे नीलचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला होता़ नीलचे हे अरेंज मॅरेज होते.  रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंती आहे. नील हा सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलचे पापा नितीन मुकेश हेही गायक आहे. मात्र नीलने आजोबा वा पापाच्या मार्गावर न जाता वेगळी वाट चोखाळली. त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला.  नील अखेरचा ‘वजीर’ या सिनेमात दिसला होता. याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’,‘आ देखें जरा’,‘शॉर्टकट रोमियो’,‘प्लेअर्स’,‘जॉनी गद्दार’ यासारख्या चित्रपटात तो अभिनय करून चुकला आहे.  नील नितीन मुकेश प्रभासच्या अपोझिट अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.  ‘साहो’ या चित्रपटात नीलची भूमिका अतिशय दमदार असणार आहे. ‘बाहुबली’नंतर प्रभासही या चित्रपटात अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे.

Web Title: Neil Nitin Mukesh named the girl Nurvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.