नील नितिन मुकेश 'फिरकी'च्या शूटिंगसाठी लंडनला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 14:15 IST2017-09-02T08:45:46+5:302017-09-02T14:15:46+5:30

अभिनेता नील नितिन मुकेश आपला आगामी चित्रपट फिरकीच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाला आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि लहान भाऊपण ...

Neil Nitin Mukesh leaves for London to shoot 'Purki' | नील नितिन मुकेश 'फिरकी'च्या शूटिंगसाठी लंडनला रवाना

नील नितिन मुकेश 'फिरकी'च्या शूटिंगसाठी लंडनला रवाना

िनेता नील नितिन मुकेश आपला आगामी चित्रपट फिरकीच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाला आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि लहान भाऊपण गेला आहे. नीलने रुक्मिणी सहायसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने एक कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. फिरकीच्या शूटिंगसाठी लंडनाला रवाना होतोय भाऊ नमन आणि पत्नीसोबत. गेल्या महिन्यात नीलच्या या थ्रिलर चित्रपटाचा पहिली झलक दाखवण्यात आली होती. या चित्रपटात नीलसह, जॅकी श्रॉफी, के.के मेनन आणि करण सिंग ग्रोवरसुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश भट्ट आणि शिबानी दांडेकर करणार आहे. 



काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या इंदू सरकारमध्ये नीलने साकारलेल्या दिगवंत नेते संजय गांधी यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नसला तरी नीलचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला.  तसेच नील रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल अगेनमध्ये सुद्धा दिसणार आहे. यात अजय देवगण, अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदे, परिणीती चोप्रा, तब्बू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. गोलमाल सीरिजचा हा चौथा चित्रपट आहे.  मात्र नीलने याआधीन गोलमालच्या एकही सीरिजमध्ये काम केलेले नाही. 

प्रभासच्या साहोमध्ये सुद्धा नील दिसणार असल्याची चर्चा होती. याचित्रपटा नील नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. याआधी ही तो सलमान खानच्या प्रेम रत्न धन पायोमध्ये नेगेटिव्ह भूमिकेत दिसला होता. साहोमध्ये नील अॅक्शन करताना दिसणार असल्याची सुद्धा चर्चा होती. याचित्रपटात प्रभासच्या अपोझिट श्रद्धा कपूर असणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाचे नाव फायनल करण्यात आले.    

Web Title: Neil Nitin Mukesh leaves for London to shoot 'Purki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.