आपल्या लग्नाच्या व-हाडासोबत असा थिरकला नील नितीन मुकेश!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 12:04 IST2017-02-06T06:32:39+5:302017-02-06T12:04:31+5:30

अभिनेता नील नितीन मुकेश याच्या लग्नाचे व-हाड उदयपुरात पोहोचले आहे. होय, नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय येत्या ९ फेबु्रवारीला उदयपुरात लग्नगाठ बांधणार आहेत.

Neil Nitin Mukesh with his wife and bone! | आपल्या लग्नाच्या व-हाडासोबत असा थिरकला नील नितीन मुकेश!!

आपल्या लग्नाच्या व-हाडासोबत असा थिरकला नील नितीन मुकेश!!

िनेता नील नितीन मुकेश याच्या लग्नाचे वºहाड उदयपुरात पोहोचले आहे. होय, नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय येत्या ९ फेबु्रवारीला उदयपुरात लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्न सोहळ्यासाठी नील व त्याचे सगळे कुटुंब रविवारी दुपारी उदयपुरात पोहोचले. याठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. व-हाड उदयपुरात पोहोचली आणि व-हाडासोबत नवरोबाही थिरकताना दिसला. 





नीलच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. या लग्नासाठी बॉलिवूडचे अनेक दिग्गज उदयपुरात येणार आहेत. या ग्रॅण्ड सोहळ्यात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार आहे. शिवाय लग्नाची वरात खास विंटेज गाड्यांमधून लग्नमंडपात पोहोचणार आहे. अभिषेक बच्चन, रणबीर कपूर आणि त्यांचे कुटुंबीय शिवाय हृतिक रोशन, कॅटरिना कैफ, जॉन अब्राहम आदी सेलिब्रिटी या लग्नात सामील होणार असल्याचे कळतेय. या लग्नासाठी ५०० पाहु्ण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.



असा आहे कार्यक्रम
७ फेबु्रवारीपासून या लग्नाचे विधी सुरु होणार आहेत. यासाठी विविध हॉटेलांमधील सुमारे ४०० खोल्या बुक केल्या गेल्या आहेत.



मंगळवारी संध्याकाळी नील व रूक्मिणी यांना कुंकु लागेल. यानंतर बुधवारी दुपारी दोघांच्या मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. याच दिवशी संध्याकाळी संगीत आणि नाईट पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.



गुरुवारी सकाळी नील व रूक्मिणी यांना हळद लागणार आहे. याच दिवशी संध्याकाळी दोघेही साता जन्माची लगीनगाठ बांधणार आहेत.



बॉलिवूडमध्ये लव्ह मॅरेजची चलती असताना नील मात्र अरेंज मॅरेज करतोय. रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंत आहे. नील आपण निवडलेल्या मुलीशी लग्न करायला तयार झाला यामुळे त्याचे आई-वडिलही जाम खूश आहेत. नितीन मुकेश यांनी नीलचे लग्न पाहुण्यांसाठी सरप्राईज असणार असल्याचे म्हटले आहे. आता या सरप्राईज पॅकेजमध्ये काय काय असणार आहे, हे कळेलच!!



ALSO READ : ​​पाहा: नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय यांचा प्री-वेडिंग अल्बम!
नील नितीन मुकेशने उरकला साखरपुडा!

Web Title: Neil Nitin Mukesh with his wife and bone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.