Neil Nitin Mukesh: नील नितीन मुकेश... तेव्हाचा आणि आत्ताचा...., अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 10:40 AM2023-01-02T10:40:05+5:302023-01-02T10:40:20+5:30

Neil Nitin Mukesh Fat to Fit: 2022 मध्ये नीलचं वजन वाढलं होतं. पोट सुटलं होतं. अखेर नीलने मनावर घेतलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय त्याने घेतला. रिझल्ट तुमच्या समोर आहे.

neil nitin mukesh fat to fit transformation actor shared photos | Neil Nitin Mukesh: नील नितीन मुकेश... तेव्हाचा आणि आत्ताचा...., अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल...!!

Neil Nitin Mukesh: नील नितीन मुकेश... तेव्हाचा आणि आत्ताचा...., अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल...!!

googlenewsNext

अभिनेता नील नितीन मुकेशने (Neil Nitin Mukesh ) इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत आणि ते पाहून चाहते थक्क झाले आहेत. होय, हे फोटो आहेत नीलच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे. यात आधीचा आणि आत्ताचा नील तुम्ही पाहू शकता. 2022 मध्ये नील कसा होता आणि 2023 मध्ये तो कसा दिसतोय? हा फरक स्पष्टपणे या फोटोत दिसतो.

2022 मध्ये नीलचं वजन वाढलं होतं. पोट सुटलं होतं. अखेर नीलने मनावर घेतलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय त्याने घेतला. रिझल्ट तुमच्या समोर आहे. यासाठी नीलने घरच्यांचे आभार मानले आहेत. 

आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर करत नील लिहितो, ‘2022 या वर्षात मला आरोग्य, कुटुंब, प्रेम, नाती या सगळ्यांचं महत्त्व कळलं. या कठीण ट्रान्सफॉर्मेशनसाठी माझं कुटुंब, माझे मित्र या सर्वांनी मला मदत केली. मला प्रोत्साहन दिलं, त्यांचा मी आभारी आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करणं किती कठीण आहे, हे मला माहित होतं. पण मी ते आव्हान स्वीकारलं. वाढलेल्या वजनामुळे अनेकांनी माझी खिल्ली उडवली. तुला हे जमणार नाही, असं म्हणत मला नाऊमेद करण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी काही लोकांनी मला सतत प्रेरणा दिली. माझे वडील, माझी आई, माझी बायको व काही मित्रांनी माझ्यावर विश्वास टाकला, मला प्रोत्साहन दिलं आणि मी आव्हान पूर्ण करू शकलो. माझ्या चाहत्यांनीही मला प्रेरणा दिली. त्यामुळे हे सगळं तुमचं यश आहे.’ 

नील हा सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलचे पापा नितीन मुकेश हेही गायक आहे. मात्र नीलने आजोबा वा पापाच्या मार्गावर न जाता वेगळी वाट निवडली.  श्रीराम राघवन यांच्या ‘जॉनी गद्दार; या चित्रपटातून नीलने पदार्पण केलं.  त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला.   प्रेम रतन धन पायो, आ देखें जरा, शॉर्टकट रोमियो,साहो अशा अनेक चित्रपटातील नीलच्या अभिनयाचं कौतुक झालं. नील लवकरच तमन्ना भाटीयाबरोबर एका तामीळ चित्रपटात झळकणार आहे.  

Web Title: neil nitin mukesh fat to fit transformation actor shared photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.