करिअरबाबत नेहा नाखुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:09 IST2016-02-14T14:09:19+5:302016-02-14T07:09:19+5:30
फिल्म इंडस्ट्रीचे ग्लॅमर सर्वांनाच मिळेल असे नाही. कित्येक कलाकार येतात आणि दोन-चार चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका करून गायब होतात. ३५ ...

करिअरबाबत नेहा नाखुश
फ ल्म इंडस्ट्रीचे ग्लॅमर सर्वांनाच मिळेल असे नाही. कित्येक कलाकार येतात आणि दोन-चार चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका करून गायब होतात.
३५ वर्षीय नेहा धुपियालासुद्धा आता करिअरची चिंता वाटू लागली आहे.
मॉडेल ते हीरोईन असा प्रवास करून आलेली नेहा म्हणते की, ‘प्रत्येकाच्या जीवनात निराशेचा एक काळ येत असतो. सध्या माझे करिअर ज्या दिशेने जात आहे त्यापासून मी फारशी खुश नाही; परंतु म्हणून मी काही हार मानणार नाही. प्रत्येक संधीचा पुरेपूर वापर करण्यात मी धन्यता मानते.’
नेहा आगामी काळात ‘संता बंता’ आणि ‘मोह माया मनी’ या दोन चित्रपटांतून झळकणार आहे. त्याव्यतिरिक्त ती टीव्ही रिअॅलिटी शो ‘रोडिज्’सुद्धा जज करणार आहे. आता पाहुया तिचा करिअर ग्राफ आणखी कसा वळण घेतो.