नेहा धूपियाच्या लग्नात ‘या’ क्रिकेटपटूंनी लावली हजेरी, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 21:27 IST2018-05-10T15:57:03+5:302018-05-10T21:27:16+5:30

नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांनी अचानकच लग्नाची बातमी देऊन चाहत्यांना धक्का दिला. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला.

Neha Dhupia's wedding anniversary show | नेहा धूपियाच्या लग्नात ‘या’ क्रिकेटपटूंनी लावली हजेरी, पाहा फोटो!

नेहा धूपियाच्या लग्नात ‘या’ क्रिकेटपटूंनी लावली हजेरी, पाहा फोटो!

िनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांनी दिल्ली येथे लग्न केले. दोघांच्या लग्नाचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वास्तविक नेहा आणि अंगदच्या लग्नाची कोणाला भनकही लागली नसती, परंतु लग्नात सहभागी झालेल्या काही लोकांना या लग्नाविषयीची माहिती असल्याने ही बाब पुढे आली आहे. नेहा आणि अंगदच्या लग्नाचे जे फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये अभिनेता आणि सूत्रसंचालक गौरव कपूर, माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आणि आशीष नेहरा बघावयास मिळाले. 



एका फोटोमध्ये तर नवरदेव-नवरी एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. खरं तर नेहानेच तिच्या लग्नाचे अचानक फोटो अपलोड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ३७ वर्षीय नेहा धूपियापेक्षा अंगद बेदी दोन वर्षांनी लहान आहे. दोघांनी दिल्लीतील गुरुद्वारात आनंद कारजची रीतिरिवाजानुसार विवाह रचला. नेहा आणि आनंदशी संबंधित सूत्रांनी एक स्टेटमेंट प्रसिद्ध केले. ज्यामध्ये लग्नाशी संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 



दरम्यान, अंगद बेदी दिल्लीसाठी रणजी खेळलेला आहे. त्याने मॉडलिंगमध्ये नशीब आजमाविल्यानंतर अभिनयात पाऊल ठेवले. अंगदने रेमो डिसूझाच्या ‘फालतू’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ‘उंगली, पिंक, टायगर जिंदा है’ या चित्रपटांमध्येही तो बघावयास मिळाला. आगामी काळात तो ‘सूरमा’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. 
 

तर नेहा धूपियाने २००२ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने २००३ मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती.  पुढे तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र तिला एकाही चित्रपटात म्हणावे तसे यश मिळाले नाही. पुढे तिने टीव्हीवरही नशीब आजमाविले. सध्या ती ‘रोडीज’ या शोमध्ये बघावयास मिळत आहे.

Web Title: Neha Dhupia's wedding anniversary show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.