Neha Dhupia On Shah Rukh Khan: "फक्त सेक्स अन् शाहरूख खान...",‘पठाण’ हिट होताच नेहा धूपियाचं जुनं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 10:56 AM2023-01-29T10:56:59+5:302023-01-29T10:57:31+5:30

Neha Dhupia On Shah Rukh Khan: होय, २० वर्षांपूर्वी नेहाने एक स्टेटमेंट दिलेलं, सध्या त्याचीच चर्चा आहे.  

neha dhupia old statement viral about shah rukh khan after pathaan hit bollywood | Neha Dhupia On Shah Rukh Khan: "फक्त सेक्स अन् शाहरूख खान...",‘पठाण’ हिट होताच नेहा धूपियाचं जुनं वक्तव्य चर्चेत

Neha Dhupia On Shah Rukh Khan: "फक्त सेक्स अन् शाहरूख खान...",‘पठाण’ हिट होताच नेहा धूपियाचं जुनं वक्तव्य चर्चेत

googlenewsNext

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) २५ जानेवारीला रिलीज झाला आणि रिलीज होताच या चित्रपटाने धुमाकूळ घातला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. चार दिवसांत चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. साहजिकच शाहरूखवर कौतुकाचा वर्षाव होतोय. चार वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या शाहरूखचं कौतुक करताना लोक थकत नाहीयेत. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही शाहरूखचं गुणगान गात आहेत. अभिनेत्री नेहा धूपिया (Neha Dhupia) त्यापैकी एक. ‘पठाण’ हिट झाल्यानंतर नेहा धूपियाचं एक जुनं वक्तव्य चर्चेत आलंय. २० वर्षांपूर्वी नेहाने एक स्टेटमेंट दिलेलं, सध्या त्याचीच चर्चा आहे.  

एका चाहत्याने ट्विटरवर नेहाच्या २० वर्षांपूर्वीच्या तिच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे.  "या देशात फक्त सेक्स आणि शाहरुख खान विकला जातो," असं २० वर्षांपूर्वी नेहा म्हणाली हाेती. 

नेहा धूपिया बॉलिवूडची बोल्ड व बिनधास्त अभिनेत्री आहे. एका चॅट शोमध्ये "बॉलिवूड फिल्मों में क्या बिकता है", असा सवाल तिला विचारण्यात आला होता. यावर, "केवल शाहरूख खान और सेक्स बिकता है", असं ती म्हणाली होती. आज तिचं हे जुनं वक्तव्य खरं ठरलं आहे. ‘पठाण’ हिट झाल्यानंतर चाहत्यांना नेहाचं हे वक्तव्य आठवलं. नेहा खरं बोलली होती. तिचे शब्द तंतोतंत खरे ठरले आहेत, असं अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.

नेहा म्हणाली..
आपलं जुनं वक्तव्य व्हायरल होत आहे, म्हटल्यावर नेहाने यावर रिॲक्ट केलं आहे. नेहाने चाहत्यावं ट्विट तिच्या सोशल मीडियावर रिट्विट केलंय.  "20 वर्षांनंतर माझे विधान खरे ठरते. ही एका अभिनेत्याची कारकीर्द नसून एका राजाची राजेशाही आहे!", असं तिने म्हटलं आहे.
‘पठाण’ गेल्या २५ जानेवारीला रिलीज झाला आणि या चित्रपटाने एकमद माहौल केला.  शाहरुख खानला पाहण्यासाठी त्याचे फॅन्स थिएटर मध्ये गर्दी करत आहेत. अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत.  पठाणने चारच दिवसांत वर्ल्डवाईड ४०० कोटींची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे.  

Web Title: neha dhupia old statement viral about shah rukh khan after pathaan hit bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.