बेफिक्रेचे नवे गाणे ‘नेदी जदे शेदम’ चा टीजर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 19:01 IST2016-12-01T18:38:48+5:302016-12-01T19:01:16+5:30
Befikre kJe T'aimel Song Teaser Out : रणवीर वाणीला ‘नेव्हर से आय लव्ह यू’ याला फ्रेंचमध्ये काय म्हणावे असे विचारतो व गाण्याची सुरुवात होते.

बेफिक्रेचे नवे गाणे ‘नेदी जदे शेदम’ चा टीजर रिलीज
गाण्याची सुरुवात एका स्टुडिओत होते, यावेळी रणवीर वाणीला ‘नेव्हर से आय लव्ह यू’ याला फ्रेंचमध्ये काय म्हणावे असे विचारतो व गाण्याची सुरुवात होते. हे गाणे परफेक्ट रोमाँटिक सॉग असल्याचे दिसते. नदी जदे शेदम या गाण्याचा फक्त टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये गाण्याचे गायक विशाल दादलानी व सुनिधी चौहान स्टुडिओत गाणे म्हणताना दिसत आहेत.
या गाण्यात रणवीर व वाणी यांनी एकत्र घालविलेले क्षण दाखविण्यात आले आहे. यावरून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असून, आता कबुली कशी द्यावी याचा विचार दोघांना पडला असल्याचे दिसते. या गाण्याला विशाल दादलानी व सुनिधी चौहान यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गायले आहे. ‘बेफिके्र’ या चित्रपटात धरम (रणवीर सिंह) व श्रेया (वाणी कपूर) प्रेम शोधण्यासाठी आवेग, अनुभव व गुंतागुंतीच्या मालिकांमध्ये अडकतात असे दाखविण्यात आले आहे.
यशराज फिल्म्स मध्ये तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आदित्य चोप्रा दिग्दर्शनात पुनरागमन करीत आहेत. यामुळे या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. २१ व्या शतकात बदलत जाणाºया प्रेमाच्या संकल्पना हा या चित्रपटाचा गाभा असून, यासाठी बेफिके्रेची निवड दुबई फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे.