Nawazuddin Siddiqui : लाल रेशमी साडीत नवाजला बघून चाहते म्हणतात, 'याला तर ऑस्कर..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 10:23 IST2022-12-18T10:22:36+5:302022-12-18T10:23:35+5:30
बॉलिवुड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी त्याच्या आगामी सिनेमातील लुकमुळे चर्चेत आहे.

Nawazuddin Siddiqui : लाल रेशमी साडीत नवाजला बघून चाहते म्हणतात, 'याला तर ऑस्कर..'
Nawazuddin Siddiqui : बॉलिवुड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी त्याच्या आगामी सिनेमातील लुकमुळे चर्चेत आहे. पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या 'हड्डी' सिनेमात नवाजुद्दिन ट्रांसजेंडरच्या भुमिकेत आहे. काही दिवसांपुर्वीच नवाजुद्दिनचा हिरव्या साडीतील फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. आता त्याचा आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यात नवाज स्त्री च्या वेशात अगदी शोभून दिसतोय. कोणी इतकं टॅलेंटेड कसं असं शकतं यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नाहीए.
'हड्डी' सिनेमात नवाज पहिल्यांदाच ट्रांसजेंडरची भुमिका साकारणार आहे. सिनेमातील त्याचे वेगवेगळे लुक समोर येत आहेत. कधी ग्रे रंगाच्या गाऊनमधला नवाज,तर कधी हिरव्या साडीतील नवाजला बघून चाहत्यांना आश्चर्य वाटते.त्याने नुकताच आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. लाल टिकली, लाल रेशमी साडी, गळ्यात मोठा हार, लोंबते कानातले, केसांची बट अशा अवतारात नवाज दिसून येतोय. इतकंच नाही तर नवाजचे चेहऱ्यावरील हावभआव सुद्धा अगदी स्त्री सारखे आहेत.
बॉलिवुड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी त्याच्या आगामी सिनेमातील लुकमुळे चर्चेत आहे. पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या 'हड्डी' सिनेमात नवाजुद्दिन ट्रांसजेंडरच्या भुमिकेत आहे. काही दिवसांपुर्वीच नवाजुद्दिनचा हिरव्या साडीतील फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. आता त्याचा आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यात नवाज स्त्री च्या वेशात अगदी शोभून दिसतोय. कोणी इतकं टॅलेंटेड कसं असं शकतं यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नाहीए.
हड्डी सिनेमात नवाज पहिल्यांदाच ट्रांसजेंडरची भुमिका साकारणार आहे. सिनेमातील त्याचे वेगवेगळे लुक समोर येत आहेत. कधी ग्रे रंगाच्या गाऊनमधला नवाज,तर कधी हिरव्या साडीतील नवाजला बघून चाहत्यांना आश्चर्य वाटते.त्याने नुकताच आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. लाल टिकली, लाल रेशमी साडी, गळ्यात मोठा हार, लोंबते कानातले, केसांची बट अशा अवतारात नवाज दिसून येतोय. इतकंच नाही तर नवाजचे चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा अगदी स्त्री सारखे आहेत.
कोणी इतकं टॅलेंटेड कसं असू शकतं. तुम्ही लेजेंड आहात, बॉलिवुडच्या इतिहासात सर्वात अप्रतिम अभिनेत्यांपैकी एक आहात अशा शब्दांत चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवाजला तर ऑस्कर मिळाला पाहिजे असेही एका चाहत्याने म्हणले आहे.
हड्डी सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत झळकतेय 'ही' मराठी अभिनेत्री
हड्डी हा सिनेमा अक्षत अजय शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. तर हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. हड्डी मधुन नवाज बॉक्सऑफिसवर काय धमाका करतो हे बघता येईल.