नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एक्स पत्नीला दुबई सरकारची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 04:33 PM2023-09-08T16:33:27+5:302023-09-08T16:34:18+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकीची एक्स पत्ननी आलियाला दुबई सरकारकडून हद्दपार करण्याची (Deportation)ची नोटीस पाठविण्यात आली आहे.

nawazuddin siddiqui ex wife aaliya gets deportation notice from dubai government for not paying rent | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एक्स पत्नीला दुबई सरकारची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एक्स पत्नीला दुबई सरकारची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत होता. नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुलांच्या कस्टडीसाठी दोघांनीही कोर्टात धाव घेतली होती. त्याबरोबरच घटस्फोटासाठ घेत वेगळं होण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. आलिया शोरा आणि यानी या त्यांच्या दोन मुलांबरोबर दुबईला वास्तव्यास आहे. आलियाला दुबई सरकारकडून हद्दपार करण्याची (Deportation)ची नोटीस पाठविण्यात आली आहे.

दुबईतील घराचं भाडं आलियाने भरलेलं नसल्यामुळे ही नोटीस पाठविण्यात आली आहे. भाडे न भरल्यास २७ हजार १८३ दिरहाम (भारतीय रुपयानुसार ६ लाख १४ हजार ३३३ रुपये) या रकमेबरोबर घर रिकामं करावं लागेल, असं नोटिशीत म्हटलं गेलं आहे. गुरुवारी(७ सप्टेंबर) काही अधिकारी आलियाच्या दुबईतील घरी आले होते. त्यांनी ही नोटीस बजावली आहे. आलियाने थकीत भाडं न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. यासंबंधी आलिया दुबईतील भारतीय दुतावासांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागणार आहे.

दारू पाजून प्रसिद्ध अभिनेत्याचा दोन महिलांवर बलात्कार, कोर्टाने सुनावली ३० वर्षांची शिक्षा

नवाजुद्दीन सिद्दीकीने २००९ साली आलियाबरोबर लग्न केलं होतं. त्यांना शोरा ही मुलगी आणि यानी हा मुलगा आहे. नवाजुद्दीनची मुले त्याच्या एक्स पत्नीसह दुबईला असतात. तिथेच त्यांचं शिक्षणही सुरू आहे. आलियाने नवाजुद्दीनवर आरोप लावताना दुबईतील घरासाठी आणि मुलांसाठी पैसे देत नसल्याचंही म्हटलं होतं. कोर्टाच्या आदेशानंतर नवाजुद्दीन नियमित पैसे पाठवत असल्याचं नंतर आलियाने सांगितलं होतं.

Web Title: nawazuddin siddiqui ex wife aaliya gets deportation notice from dubai government for not paying rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.