/>सलमान, अरबाझ आणि सोहेल खान या तिन्ही भावंडांशी सध्या नवाझचा घरोबा वाढलेला असून पैकी सोहेल शी आपले जास्तच जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे नवाझने सांगितले. ‘किक’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर सलमान खानच्या निकटवर्तींमध्ये अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीची गणना होऊ लागली आहे. नवाझ पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून सोहेलबरोबर आणि सहअभिनेता म्हणून अरबाझ खानबरोबर काम करतो आहे. अर्थात, नवाझने पहिल्यांदा सलमानबरोबरच काम केले आहे आणि आपल्या अभिनयाने त्याला जिंकून घेतले असल्याने त्याचा भाईशी खास दोस्ताना असणे समजू शकते. मात्र या तिन्ही भावंडांमध्ये सोहेलशी आपले जास्त जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे नवाझने सांगितले.