नर्गिस करतेय लग्नाचे प्लॅनिंग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 13:46 IST2016-08-24T08:16:36+5:302016-08-24T13:46:36+5:30

 ‘अजहर’ मध्ये ग्लॅमरस लूकमध्ये अभिनय करणारी नर्गिस फाखरी ही आता ‘बँजो’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मध्यंतरी बॉयफ्रेंड उदय ...

Nargis wedding planning? | नर्गिस करतेय लग्नाचे प्लॅनिंग ?

नर्गिस करतेय लग्नाचे प्लॅनिंग ?

 
अजहर’ मध्ये ग्लॅमरस लूकमध्ये अभिनय करणारी नर्गिस फाखरी ही आता ‘बँजो’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मध्यंतरी बॉयफ्रेंड उदय चोप्रा सोबत झालेल्या ब्रेकअपमुळे ती कायमची भारत सोडून जाणार की काय? अशी चर्चा सुरू होती. मात्र, तिने तिच्या आजाराचे कारण पुढे करून या सर्व अफवांना नकार दिला.

मात्र, सध्या ती मुंबईत असून तिची तब्येत भयानक खराब झाल्याचे तिला लक्षात आले. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा आणि आयुर्वेदिक औषधांचा सल्ला दिला. तिच्या लग्नाबद्दल बोलताना ती म्हणाली,‘ मी सध्या लग्नाचा विचार करत नाहीये. आपण पाहतोय की, सध्या सर्वांचे लग्न हे तुटत आहेत. नातेसंबंध फारच कमकुवत होत आहेत.

लग्न हे केवळ एक लेबल आहे. प्रत्येकजण आपल्या जोडीदाराचा अर्धा भाग असतो. मला हे नियम आवडत नाहीत. आणि मला कोणाची  गरजही नाही. पण, मला जर वाटले की, लग्नाची आता ही योग्य वेळ आहे. तर मी कुणाची वाट पाहणार नाही...!’

Web Title: Nargis wedding planning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.