नर्गिस फाखरीने गुपचूप केलं टोनी बेगसोबत लग्न, पहिल्यांदाच स्पॉट झाले एकत्र, कोण आहे तिचा पती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:29 IST2025-09-01T14:28:47+5:302025-09-01T14:29:55+5:30

Nargis Fakhri : रॉकस्टार अभिनेत्री नर्गिस फाखरी पहिल्यांदाच तिचा पती टोनी बेगसोबत दिसली. दोघांनीही गुपचूप लग्न केले होते. पण अलीकडेच दोघेही एनएमएसीसी कार्यक्रमात फराह खानसोबत पोज देताना दिसले. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत कारण गुपचूप लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत.

Nargis Fakhri secretly married Tony Baig, spotted together for the first time, who is her husband? | नर्गिस फाखरीने गुपचूप केलं टोनी बेगसोबत लग्न, पहिल्यांदाच स्पॉट झाले एकत्र, कोण आहे तिचा पती?

नर्गिस फाखरीने गुपचूप केलं टोनी बेगसोबत लग्न, पहिल्यांदाच स्पॉट झाले एकत्र, कोण आहे तिचा पती?

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी(Nargis Fakhri)ने कॅलिफोर्नियामध्ये तिचा प्रियकर टोनी बेग(Tony Baig)शी गुपचूप लग्न केल्याचे समजते आहे. अलिकडेच, ती मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात दिसली. या कार्यक्रमात तिचा पती टोनीसोबत तिची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेतली. एका व्हिडीओमध्ये, नर्गिस, टोनी आणि चित्रपट निर्माती फराह खानसोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसली. नर्गिसने महिमा महाजनने डिझाइन केलेली वाइन रंगाची लेहेंगा-चोली घातली होती, तिने सोन्याच्या बांगड्या आणि मॅचिंग नेकलेससह लूक पूर्ण केला होता. दुसरीकडे, टोनी पूर्णपणे काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला ज्यामध्ये तो खूपच आकर्षक दिसत होता.

नर्गिसने या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि अमेरिकन उद्योगपती टोनीशी लग्न केल्याचे वृत्त आहे. लग्न करण्यापूर्वी दोघांनी एकमेकांना सुमारे तीन वर्षे डेट केले. त्यांनी दुबईमध्ये नवीन वर्ष २०२४ देखील एकत्र साजरे केले, जिथे नर्गिसचा एक्स बॉयफ्रेंड उदय चोप्रा देखील उपस्थित होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो रेडिटवर समोर आले होते.

कोण आहे टोनी बेग?
टोनी बेग हा एक इंडो-अमेरिकन बिझनेस टायकून आहे ज्याचा जन्म १९८४ मध्ये भारतातील काश्मीरमध्ये झाला होता. तो डायस ग्रुपचा संस्थापक आहे. टोनी हा टेलिव्हिजन निर्माता जॉनी बेगचा भाऊ आहे, तर त्याचे वडील शकील अहमद बेग हे जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमहानिरीक्षक आणि राजकारणी आहेत. त्याने ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया विद्यापीठातून व्यवसाय, व्यवस्थापन आणि एमबीएमध्ये पदवी घेतली आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील एका आलिशान हॉटेलमध्ये अतिशय खाजगी समारंभात या जोडप्याचे लग्न झाले. नर्गिस आणि टोनी दोघांनीही त्यांच्या लग्नात फोटो न ठेवण्याची पॉलिसी लागू केली. त्यांच्या लग्नाला जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते.


नर्गिस शेवटची झळकली या सिनेमात
नर्गिस अलीकडेच साजिद नाडियाडवालाच्या हाऊसफुल ५ मध्ये दिसली होती. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या कॉमेडी-थ्रिलर चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, संजय दत्त, फरदीन खान, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, दिनो मोरिया, जॅकलिन फर्नांडिस, चित्रांगदा सिंग, सोनम बाजवा, सौंदर्या शर्मा, चंकी पांडे, निकितिन धीर आणि जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २८८.५८ कोटींची कमाई केली.

Web Title: Nargis Fakhri secretly married Tony Baig, spotted together for the first time, who is her husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.