​नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर येणार चित्रपट... हा अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 10:22 IST2017-09-19T04:52:20+5:302017-09-19T10:22:20+5:30

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुष्य हे सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवला जाणार आहे. एक सामान्य ...

Narendra Modi's role in becoming the actor of the movie ... | ​नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर येणार चित्रपट... हा अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका

​नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर येणार चित्रपट... हा अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका

ंप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुष्य हे सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवला जाणार आहे. एक सामान्य चहावाला ते पंतप्रधान बनण्याचा त्यांचा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव हूँ नरेंद्र मोदी बनवा मांग छू असे असून हा चित्रपट गुजराती भाषेत असणार आहे. तसेच या चित्रपटाचे अनेक भाषेत डबिंग केले जाणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल नरयानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी आजवर अनेक गुजराती आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक अनिल नरयानी सांगतात, या चित्रपटामध्ये नरेंद्र मोदी यांच्या संघर्षाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण पूर्ण झालेले आहे. आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा आणि सुरत येथे केले आहे. हा चित्रपट बनवताना आम्ही लहान मुलांना आणि तरुण पिढीला डोळ्यांसमोर ठेवले आहे. या चित्रपटामुळे त्यांना देखील त्यांच्या आयुष्यात प्रगती करायला प्रेरणा मिळेल असे मला वाटते. आज नरेंद्र मोदी देशाच्या प्रगतीसाठी जी पाऊलं उचलत आहेत, भारताच्या प्रगतीसाठी दिवस-रात्र काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आज आपण देखील नरेंद्र मोदी बनावे असेच वाटते. त्यामुळे या चित्रपटाचे नाव देखील मला देखील नरेंद्र मोदी बनायचे आहे असेच ठेवण्यात आले आहे. नरेंद्र मोदीने त्यांच्या बालपणी खूपच संघर्ष केला आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पडद्यावर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मी माझ्या आयुष्यात त्यांना हिरो मानतो आणि त्यामुळेच त्यांचे आयुष्य मला लोकांना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायचे होते. 

Narendra modi

हूँ नरेंद्र मोदी बनवा मांग छू या चित्रपटात तीन गाणी असणार आहेत. ही तिन्ही गाणी प्रेक्षकांना प्रेरणा देणारी ठरणार आहेत. हा चित्रपट १७ नोव्हेंबरला गुजरातमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट इतर भाषांमध्ये देखील डब करण्यात येणार आहे. 
या चित्रपटात ओमकार दास, अनेशा सयैद, करण पटेल आणि हिराल यांच्या मुख्य भूमिका आहेत. पवन पोद्दार आणि तान्या शर्मा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात नरेंद्र मोदींच्या भूमिकेत प्रेक्षकांना ओमकार दासला पाहायला मिळणार आहे. ओमकारने पिपली लाईव्ह या चित्रपटात काम केले होते. 

Also Read : अदनान सामीच्या परिवाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!


Web Title: Narendra Modi's role in becoming the actor of the movie ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.