फिल्मी आहे नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:04 IST2021-02-10T17:00:29+5:302021-02-10T17:04:47+5:30

अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

namrata shirodkar mahesh babu love story | फिल्मी आहे नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची लव्हस्टोरी

फिल्मी आहे नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची लव्हस्टोरी

ठळक मुद्दे२००० साली एका तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नम्रता आणि महेश यांची ओळख झाली होती. त्यानंतर जवळपास पाच वर्षें त्यांनी एकमेकांना डेट केले. या दरम्यान त्यांनी त्यांचे नाते मीडियापासून लपवून ठेवले होते.

प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. महेश बाबूचे फॅन्स त्या दोघांना सोशल मीडियाद्वारे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या निमित्ताने त्या दोघांचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या लग्नाला आज १६ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

२००० साली एका तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नम्रता आणि महेश यांची ओळख झाली होती. त्यानंतर जवळपास पाच वर्षें त्यांनी एकमेकांना डेट केले. या दरम्यान त्यांनी त्यांचे नाते मीडियापासून लपवून ठेवले होते. २००५ मध्ये नम्रता आणि महेश बाबू लग्नाच्या बेडीत अडकले. नम्रता महेश बाबूपेक्षा जवळपास तीन वर्षांनी मोठी आहे. फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावलेल्या नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्नाच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती वास्तव, पुकार, दिल वील प्यार व्यार यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. मात्र लग्नानंतर नम्रता सिनेमांमध्ये कमी आणि संसारात जास्त रमली.

महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबूने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महेश बाबू फक्त २६ वर्षांचा होता जेव्हा त्याचे क्रश नम्रता शिरोडकरवर होते. सोशल मीडियावर आयोजित एका सत्रात महेश बाबूने अनेक खुलासे केले होते.त्यात त्याचे कोणावर कधी क्रॅश होते का? असे त्याला एका फॅनने विचारले होते. यावर उत्तर देताना महेशने सांगितले होते की, "हो, मी २६ वर्षांचा असताना माझे एका मुलीवर क्रश होते. त्यानंतर मी तिच्याशीच लग्न केले.

Web Title: namrata shirodkar mahesh babu love story