‘वन नाइट स्टॅण्ड’च्या शूटिंगवेळी नशेत असायची नायरा बॅनजी; स्पॉटबॉय घेऊन यायचा लिंबू-पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 22:19 IST2017-08-29T16:49:39+5:302017-08-29T22:19:39+5:30

इंटीमेट सीन्स देताना मी प्रचंड दडपणात होती. सीन्स देताना जवळपास क्रू मेंबर्स असल्याने असे सीन्स देताना प्रचंड घबराट होत होती. कारण मला भीती वाटत होती की, मला अशा अवस्थेत आईने बघितल्यास ती मला घराबाहेर काढेल.

Naira Banji used to be drunk during the shooting of 'One Night Stand'; Lemon-water to bring spotboy! | ‘वन नाइट स्टॅण्ड’च्या शूटिंगवेळी नशेत असायची नायरा बॅनजी; स्पॉटबॉय घेऊन यायचा लिंबू-पाणी!

‘वन नाइट स्टॅण्ड’च्या शूटिंगवेळी नशेत असायची नायरा बॅनजी; स्पॉटबॉय घेऊन यायचा लिंबू-पाणी!

यरा बॅनर्जी हे नाव तुम्ही ऐकले आहे काय? नायरा एक अभिनेत्री तथा मॉडेल आहे. तिला मधुरिमा या नावानेही ओळखले जाते. २०१६ मध्ये तिचा ‘वन नाइट स्टॅण्ड’ हा चित्रपट आला होता. चित्रपटाचे जसे नाव आहे तसेच काहीसे कामही तिने चित्रपटात केले आहे. कारण चित्रपटात बºयाच इंटीमेट सीन्सचा भडिमार करण्यात आला आहे. त्यातील बºयाचशा सीन्समध्ये नायरा आहे. नायराने हे सीन्स आत्मविश्वासाने केले असावेत, असे पडद्यावर बघून प्रेक्षकांना वाटते. मात्र वास्तव वेगळे आहे. कारण हे सीन्स देताना ती प्रचंड घाबरलेली होती. 

एका साप्ताहिकात दिलेल्या मुलाखतीत नायराने म्हटले की, इंटीमेट सीन्स देताना मी प्रचंड दडपणात होती. सीन्स देताना जवळपास क्रू मेंबर्स असल्याने असे सीन्स देताना प्रचंड घबराट होत होती. कारण मला भीती वाटत होती की, मला अशा अवस्थेत आईने बघितल्यास ती मला घराबाहेर काढेल. त्यावेळी नायराचे शूटिंग शेड्यूल खूपच व्यस्त असायचे. रात्रीच तिला शूटिंग करावी लागत असे. कारण दिवसा कन्नड चित्रपट ‘टायगर’साठी तिला बंगळुरू येथे जावे लागत असे. अशात तिला खूप थकवा जाणवत असे. यामुळे ती अल्कोहोलच्या आहारी गेली. 



नशेचा आधाराने ती दिवस-रात्र स्वत:ला व्यस्त ठेवत असे. याविषयी नायराने सांगितले होते की, अल्कोहोलमुळेच मला थकव्यापासून काहींशी उसंत मिळत असे. जेव्हा मी इंटीमेट सीन्स देत असे तेव्हा मी नशेत असायची. त्यानंतर क्रू माझ्यासाठी लींबू-पाणी घेऊन येत असे. जणेकरून दुसºया दिवशी मला फ्रेशपणे बंगळुरूला जाणे शक्य होत असे. मात्र हा सर्व अनुभव माझ्यासाठी भयावह असल्याचेही नायराने सांगितले. 

जॅसमिन डिसूझा यांनी दिग्दर्शित केलेला ‘वन नाइट स्टॅण्ड’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नव्हता. चित्रपटात रती अग्निहोत्री यांचा मुलगा तनुज वीरवानी, नायरा बॅनर्जी आणि सनी लिओनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सनी लिओनीमुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. 

Web Title: Naira Banji used to be drunk during the shooting of 'One Night Stand'; Lemon-water to bring spotboy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.