बाबो! नागार्जुनचा लेक नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू, आमिर खानसोबत दिसणार 'लाल सिंग चड्ढा'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:35 IST2021-05-05T15:22:20+5:302021-05-05T15:35:47+5:30
नागा तेलुगु सिनेसृष्टी लोकप्रिय अभिनेता आहे.

बाबो! नागार्जुनचा लेक नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू, आमिर खानसोबत दिसणार 'लाल सिंग चड्ढा'मध्ये
तेलगू सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya)ने दक्षिण इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. नागा चैतन्य हा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. आता नागा बॉलिवूडमध्ये सुपरस्टार आमिर खानसोबत वेत 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) मध्ये डेब्यू करणार आहे. असे म्हटले जात आहे की लवकरच नागा आमिरसोबत लडाख आणि कारगिलमध्ये शूटिंगला सुरुवात करेल. शूटिंग सुमारे 45 दिवस चालणार असून आमिर तिथे टीमसह पोहोचला आहे.
या भूमिकेसाठी नागा चैतन्यच्या आधी विजय सेठूपतीला कास्ट केले होते. काही कारणास्तव, त्याला ही भूमिका साकारता आली नाही. नागा आणि आमिर चित्रपटाचे काही महत्त्वाचे अॅक्शन आणि वॉर सीक्वेन्सचे शूटिंग करणार आहेत, असे एका सूत्राने सांगितले आहे. शूटिंग लवकरच सुरू होईल.
सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा चित्रपट फॉरेस्ट गम्पचा हिंदी रिमेक 'लाल सिंह चड्ढा'साठी आमिर खान खूप मेहनत घेतो आहे. 'लाल सिंह चड्ढामध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच मोना सिंह एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अतुल कुलकर्णी द्वारे लिखित आणि अद्वैत चंदन द्वारे दिग्दर्शित करण्यात आला असून प्रीतम यांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गीत लेखन केले आहे.आमिर खानसाठी 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.