Hrithik Roshanला डेट करत असल्याच्या चर्चेवर मिस्ट्री गर्लनं सोडलं मौन, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:31 IST2022-01-31T15:30:08+5:302022-01-31T15:31:52+5:30
अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) त्याच्या चित्रपटांशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Hrithik Roshanला डेट करत असल्याच्या चर्चेवर मिस्ट्री गर्लनं सोडलं मौन, म्हणाली...
बॉलिवूडचा क्रिश म्हणजेच अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी तो मिस्ट्री गर्लमुळे चर्चेत आला आहे. खरेतर हृतिक रोशन शनिवारी मुंबईतील जपानी रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला. त्याच्यासोबत एक मुलगीही होती जिचा हात पकडून तो बाहेर पडताना दिसला. या मिस्ट्री गर्लचे नाव मीडियात समोर आले आहे. ती दुसरी कोणी नसून दिल कबड्डी आणि मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातील अभिनेत्री आहे. सबा एक संगीतकार देखील आहे. आता तिचे नाव हृतिक रोशनसोबत जोडले जात आहे. मात्र त्यांच्या नात्याबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.
बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, सबाला ती हृतिक रोशनला डेट करत असल्याचे विचारले असता तिने त्यावर बोलण्यास टाळाटाळ केली. तिने म्हटले की, सॉरी मी काहीतरी काम करते आहे. मी तुम्हाला नंतर कॉल करते. तिने हृतिक रोशनबद्दल विचारले असता त्या चर्चेचे समर्थन केले नाही आणि ती बाब नाकारलीदेखील नाही.
सबा एक संगीतकार असल्याचा अंदाजही काही लोक वर्तवत आहेत तरी हृतिक तिच्यासोबत एखाद्या म्युझिक व्हिडिओ किंवा तत्सम प्रोजेक्टसाठी दिसला असावा. आतापर्यंत दोघांच्या रिलेशनशीप स्टेटसबाबत इंडस्ट्रीकडून कोणीही काहीही स्पष्ट केलेले नाही. आता या दोघांमध्ये काय शिजतंय हे फक्त हृतिक आणि सबाच सांगू शकतात.
हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तो फायटर, विक्रम वेधा, वॉर २ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याच्या विक्रम वेधचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.