माझ्या नवऱ्याची बायको..! सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगबद्दल पहिल्यांदाच बोलली करीना, वाचून व्हाल हैराण

By तेजल गावडे | Updated: October 15, 2020 15:29 IST2020-10-15T15:29:17+5:302020-10-15T15:29:49+5:30

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगबद्दल पहिल्यांदाच करीना कपूरने व्यक्त केले होते मत

My husband's wife ..! Kareena speaks for the first time about Saif Ali Khan's first wife Amrita Singh | माझ्या नवऱ्याची बायको..! सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगबद्दल पहिल्यांदाच बोलली करीना, वाचून व्हाल हैराण

माझ्या नवऱ्याची बायको..! सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगबद्दल पहिल्यांदाच बोलली करीना, वाचून व्हाल हैराण

बॉलिवूडमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्स अँगल समोर आल्यापासून सगळीकडे खळबळ माजली आहे. ड्रग्स प्रकरणात सारा अली खान, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत यांचे नाव समोर आले होते. या सेलिब्रेटींची एनसीबीने चौकशीदेखील केली. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचे ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर सैफ अली खान नाराज झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ कित्येक दिवस सारासोबत बोलला नव्हता. जेव्हा ही बाब मीडियामध्ये व्हायरल झाली तेव्हा सैफने यावर चुप्पी तोडत सांगितले की, मी माझ्या सर्व मुलांवर समान प्रेम करतो आणि मी कोणावर नाराज नाही.


सैफ अली खानची दुसरी पत्नी म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरने पहिल्यांदाच सैफची पहिली पत्नी अमृता सिंगबद्दल बोलली आहे. करीना कपूरने कॉफी विथ करण शोमध्ये अमृता सिंगबद्दल सांगितले होते.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा करीनाला करण जोहरने अमृताबद्दल विचारले तेव्हा करीना म्हणाली की माझी त्यांच्यासोबत भेट होत नाही आणि मी त्यांचा खूप आदर करते. ती पुढे म्हणाली की, एकदा माझी थेट अमृता सोबत भेट झाली होती जेव्हा सारा छोटी होती. 


तर करीना पुढे म्हणाली की, सैफचे आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि लग्नापूर्वी त्यांनी मला सांगितले होते की माझ्यासाठी माझी मुले सर्वकाही आहेत. अमृताची मुले सारा आणि इब्राहिमच्या प्रश्नावर करीनाने सांगितले की, ते दोघे मला समान आहेत. मी तैमूर, सारा आणि इब्राहिमवर तितकेच प्रेम करते. दोन्ही मुले माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. 


सध्या करीना कपूर आणि सैफ अली खान दिल्लीत आहेत.

करीनाने नुकतेच लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

तसेच करीना कपूर आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. 

Web Title: My husband's wife ..! Kareena speaks for the first time about Saif Ali Khan's first wife Amrita Singh