MUST WATCH : ​‘रईस’मधून डिलिट करण्यात आलेले शाहरूख-माहिराचे हे गाणे तुम्ही पाहिलेत??

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 13:27 IST2017-02-06T07:57:09+5:302017-02-06T13:27:09+5:30

शाहरूख खान आणि माहिरा खान यांच्या ‘रईस’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर शंभर कोटींवर गल्ला जमवला. पण या चित्रपटातील एक गाणे तुम्ही अद्याप पाहिलेलेच नाही. हे गाणे शाहरूख व माहिरावर चित्रीत करण्यात आलेय.

MUST WATCH: Have you seen this song that has been deleted from 'Raise'? | MUST WATCH : ​‘रईस’मधून डिलिट करण्यात आलेले शाहरूख-माहिराचे हे गाणे तुम्ही पाहिलेत??

MUST WATCH : ​‘रईस’मधून डिलिट करण्यात आलेले शाहरूख-माहिराचे हे गाणे तुम्ही पाहिलेत??

हरूख खान आणि माहिरा खान यांच्या ‘रईस’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर शंभर कोटींवर गल्ला जमवला. शाहरूख व पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान या दोघांची या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. पण तरिही शाहरूख व माहिराची ‘असली’ केमिस्ट्री पाहायला आपण मुकलात. होय, कारण ही ‘असली’ केमिस्ट्री दाखवणारे या चित्रपटातील एक गाणे तुम्ही अद्याप पाहिलेलेच नाही. हे गाणे शाहरूख व माहिरावर चित्रीत करण्यात आलेय. पण चित्रपटातून ऐनवेळी हे गाणे गाळण्यात आले. आता ते का गाळण्यात आले, यामागे एक कारण होते. या गाण्यामुळे चित्रपटाची लांबी वाढणार होती. चित्रपट लांबून रटाळ होऊ नये, यामुळे ऐनवेळी हे गाणे ‘रईस’मधून गाळण्यात आले. अर्थात चित्रपट रिलीज झाल्यानंतर इतक्या दिवसांनी चित्रपटातून डिलिट करण्यात आलेले हे गाणे जारी करण्यात आले आहे. ‘हल्का हल्का...’ असे या गाण्याचे बोल आहेत.



सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील या गाण्याला संगीत दिलेय, राम संपत यांनी. गीताचे शब्द आहेत, जावेद अख्तर यांचे. ‘जालिमा’ या गाण्यात माहिरा व शाहरूख यांची केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत. पण या गाण्यात माहिराचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. या गाण्यात नटखट माहिरा शाहरूखची छेड काढताना दिसतेय आणि शाहरूख ८० च्या दशकातील हिरोप्रमाणे रस्त्यावर नाचतोय. गाण्यात चिंब चिंब भिजवणारा पाऊसही आहे. त्यामुळे हे गाणे तुम्हाला ‘टिप टिप बरसा पानी’चा फिल देणारे आहे. तेव्हा पाहा तर,‘हल्का हल्का...’ हे शाहरूख व माहिराच्या जबरदस्त केमिस्ट्रीने रंगलेले गीत...
 
ALSO READ : Box office : पाहा दहा दिवसांत ‘रईस’ने किती केली कमाई!
ना छलके जाम...जश्न कमाल! अशी रंगली ‘रईस’ची सक्सेस पार्टी!!
 

Web Title: MUST WATCH: Have you seen this song that has been deleted from 'Raise'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.