Must Watch : मुबारकांमधले 'द गोगल साँग' आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 15:19 IST2017-07-07T09:40:04+5:302017-07-07T15:19:54+5:30

मुबारकां चित्रपटातील गोगल साँग हे नवं गाणं आऊट झाले आहे. हे गाणं ऐकून तुमचे पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.

Must Watch: The Goggle Song 'Out' in Happy | Must Watch : मुबारकांमधले 'द गोगल साँग' आऊट

Must Watch : मुबारकांमधले 'द गोगल साँग' आऊट

बारकां चित्रपटचे आणखीन एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.याआधी रिलीज झालेले 'हवा हवा' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. हे गाणे ८० च्या दशकात असलेल्या गाण्याचा रिमिक्स आहे. या गाण्याचे नवे व्हर्जन मिका सिंहने गायले आहे. यानंतर आता मुबारकांमधले आणखीन एक ‘गोगल साँग' रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं ऐकून तुमचे पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. गाण्याच्या सुरुवातीलाच अनिल कपूर पंजाबी स्टाइलमध्ये नाचतो. त्यानंतर त्याच्यासोबत आथिया शेट्टी, इलियाना  डिक्रूज आणि अर्जुन कपूर ही नाचतात. अनिल कपूरचा या गाण्यामधला अंदाज तुम्हाला चित्रपट बीवी नंबर 1 मधल्या हाय हाय मिर्ची गाण्याची आठवण करुन नक्कीच देईल. इलियाना आणि आथिया आपल्या ठुमक्यांनी तुमची मनं जिंकून घेतील. या गाण्याला सोनू निगम, अरमान मलिक, तुलसी कुमार, निति मोहन आणि अमाल मलिक यांनी आवाज दिला आहे.



also read :  मुबारकां’चे मिका सिंहच्या आवाजातील ‘हवा हवा...’ गाणे ऐकाच!

मुबारकांच्या ट्रेलर ही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट अर्जुन कपूरचा डबल रोल आहे. त्याच्या खऱ्या आयुष्यातला काका म्हणजेच अनिल कपूर चित्रपटात ही त्याच्या काकाची भूमिका साकारत आहे. पहिल्यांदाच काका-पुतण्याची जोडी पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटाची कथा करण सिंग आणि चरण सिंग या दोन जुळ्या भावांभवती फिरते. करण सिंग खूपच बिधनास्त असतो तर चरण सिंग लाजाळू असतो. त्यांचा काका करतार सिंग आपल्या पुतण्यांना कोणत्याही संकटात बघू शकत नाही. आथिया शेट्टी एक सरळ साधी मुलगी असलेल्या बिंकल नावाच्या मुलीची भूमिका करते आहे. तर इलियाना स्वीटी नावाच्या एका मॉडेलचा रोल करते आहे. चित्रपट 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Must Watch: The Goggle Song 'Out' in Happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.