Must Read : ​‘त्या’ न्यूड फोटोवर पुन्हा बोलली कल्की कोच्लिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 12:56 IST2017-08-21T07:25:42+5:302017-08-21T12:56:16+5:30

दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून दिसेनासी झालेली अभिनेत्री कल्की कोच्लिन अलीकडे चर्चेत आली ती तिच्या न्यूड फोटोमुळे. इशा गुप्तापाठोपाठ कल्कीने तिचा न्यूड ...

Must Read: 'That' Naked photo speaks again Kalki Kochlin! | Must Read : ​‘त्या’ न्यूड फोटोवर पुन्हा बोलली कल्की कोच्लिन!

Must Read : ​‘त्या’ न्यूड फोटोवर पुन्हा बोलली कल्की कोच्लिन!

र्घकाळापासून बॉलिवूडमधून दिसेनासी झालेली अभिनेत्री कल्की कोच्लिन अलीकडे चर्चेत आली ती तिच्या न्यूड फोटोमुळे. इशा गुप्तापाठोपाठ कल्कीने तिचा न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि मग सगळीकडे कल्कीच्या याच फोटोची चर्चा रंगली. अर्थात इशा तिच्या न्यूड फोटोवरून ट्रोल झाली, तसे कल्कीचे झाले नाही. उलट तिच्या या फोटोला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्वत:वर प्रेम करा ,असा संदेश देण्याचा प्रयत्न कल्कीने या फोटोद्वारे केला. हा फोटो पोस्ट करताना #loveyournakedness या हॅशटॅगचा वापर तिने केला.  आयुष्यातील नकारात्मक गोष्टींवरही प्रेम करा, हेच कल्कीला यातून सुचवायचे होते.



कल्कीने या फोटोद्वारे दिलेला संदेश कुणी कसा घेतला, हे दाव्यानिशी सांगता येणार नाही. पण कल्की मात्र या फोटोवर आणखी खुलासेवार बोलली. ‘महिला म्हणून नेहमी आपल्याला पुरूषांच्या दृष्टिकोनातून बघितले जाते. पण माझा हा न्यूड फोटो एका महिला फोटोग्राफरने काढला आहे.  त्यामुळेच तो सोशल मीडियावर शेअर करावा, असे मला प्रकर्षाने वाटले. माझ्या मते,लोक काय म्हणतील याचा विचार न करता, तुम्ही जे आहात, जसे आहात, त्यावर तुमचे स्वत:चे प्रेम असायला हवे. जसे आहात तसे स्वत:ला स्वीकाराल तरच जग तुम्हाला स्वीकारले. मी माझा न्यूड फोटो शेअर केला, यात मला काहीही लाजीरवाणे वाटत नाही’ असे कल्की म्हणाली.एकंदर काय तर, कुणालाही जज करण्याआधी विचार करा, हेच कल्कीने सांगितले. 

ALSO RAED : इशा गुप्ताचं नाही तर कल्की कोच्लिनही झाली ‘न्यूड’!!

कल्कीच्या आधी इशानेही हेच सांगितले होते. माझ्या सेमी न्यूड, न्यूड फोटोंवर काहीही बोला, मला फरक पडत नाही. कारण या फोटोत कुठलीही अश्लिलता नाही. माझ्या मते, केवळ हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे, असे इशा म्हणाली होती.

Web Title: Must Read: 'That' Naked photo speaks again Kalki Kochlin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.