अभिनेता मुरली शर्मावर कोसळला दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 13:06 IST2020-06-09T13:05:23+5:302020-06-09T13:06:17+5:30
गोलमाल फेम मुरली शर्माच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असून त्याला याचा चांगलाच धक्का बसला आहे.

अभिनेता मुरली शर्मावर कोसळला दुःखाचा डोंगर
गोलमाल, मैं हू ना यांसारख्या अनेक चित्रपटांद्वारे आपले मनोरंजन करणाऱ्या मुरली शर्मावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे ७ जूनला हृदयविकाराच्या झटक्यातने निधन झाले. मुरली यांच्या आईचे नाव पद्मा असून त्या ७६ वर्षांच्या होत्या.
पद्मा यांचे निधन त्यांच्या मुंबई येथील राहात्या घरी झाले. मुरली शर्माला त्याच्या आईच्या निधनाचा चांगलाच धक्का बसला आहे. त्याच्या वडिलांचे निधन गेल्याच वर्षी झाले होते. सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने अतिशय कमी नातेवाईकांच्या आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत पद्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुरली शर्माने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. गोलमाल या चित्रपटांच्या सीरिजमधील त्याच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले आहे. त्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केले असून शाहरुख खान सोबत मैं हू ना, सलमान खान सोबत दबंग या चित्रपटात तो झळकला आहे. प्रभासच्या साहो या काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिनेत्री अश्विनी काळसेकर ही त्याची पत्नी असून त्या दोघांनी गोलमाल सिरिजमध्ये एकत्र काम केले आहे.