‘मुन्नाभाई ३’ येणार २०१८ मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 10:07 IST2016-08-02T04:37:10+5:302016-08-02T10:07:10+5:30

महेश मांजरेकरचा मराठी चित्रपट ‘दे धक्का’चा हिंदी रिमेक नंतर अभिनेता संजय दत्तने मुन्नाभाई सिरीजमधील तिसरा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणार ...

'Munnabhai 3' will come in 2018 | ‘मुन्नाभाई ३’ येणार २०१८ मध्ये

‘मुन्नाभाई ३’ येणार २०१८ मध्ये

ेश मांजरेकरचा मराठी चित्रपट ‘दे धक्का’चा हिंदी रिमेक नंतर अभिनेता संजय दत्तने मुन्नाभाई सिरीजमधील तिसरा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. तसेच विधू विनोद चोप्रासोबतच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. 
मुन्नाभाईमध्ये सर्किटची भूमिका साकारणारा अरशद वारसी याने संजयवर सुरु असलेल्या बायोपिकमुळे या चित्रपटाच्या चित्रिकरणाला वेळ होत असल्याचे सांगितले होते. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिका साकरत आहे. याचे शुटिंग जूनपासून सुरु होणार होते. मात्र, अद्याप याचे शुटिंगच सुरु न झाल्याने इतर चित्रपटांच्या चित्रिकरणाला वेळ होत असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, संजयवरील बायोपिकसंदर्भात त्यालाच विचारले असता, त्याने या चित्रपटात मी अभिनय करणार नसल्याचे स्पष्ट केले. हा चित्रपट येत्या फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही त्याने सांगितले.

Web Title: 'Munnabhai 3' will come in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.