'मुन्नाभाई ३'चे शूटिंग सुरू? मुन्नाभाई-सर्किट जोडीचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:15 PM2023-09-15T13:15:50+5:302023-09-15T13:20:13+5:30

मुन्नाभाई-सर्किट जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मग तुमची ही इच्छा पूर्णच झाली म्हणून समजा.

Munna aka Sanjay Dutt reunites with Circuit aka Arshad Warsi with rajkumar hirani for Munnabhai 3 | 'मुन्नाभाई ३'चे शूटिंग सुरू? मुन्नाभाई-सर्किट जोडीचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल

Sanjay Dutt

googlenewsNext

मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमांनी सुपरहीट कमाई केली. त्यामुळे, साहजिकच चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना अपेक्षा लागली आहे. मुन्नाभाई-सर्किट जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मग तुमची ही इच्छा पूर्णच झाली म्हणून समजा. मुन्नाभाईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राजकुमार हिरानीसोबतसंजय दत्त आणि अरशद वारसी दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर राजकुमार हिरानी यांनी मुन्ना भाई 3 च्या शूटिंगला सुरुवात केली आहे का? हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, या व्हिडीओत संजू बाबा त्याच्या मुन्नाभाई अवतारात केशरी शर्ट घातलेला दिसतोय. तर  अरशद हा सर्किट गेटअपमध्ये दिसत आहे. या दोन्ही अभिनेत्यांसोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानीही दिसत आहेत. व्हिडीओमध्ये  मुन्नाभाईमधील टायटल ट्रकचा आवाज ऐकायला येतोय. 'अखेर आपण एकत्र आलो', असे राजकुमार हिराणी बोलताना दिसत आहे. 

या व्हायरल व्हिडिओनंतर आता लवकरच आपल्याला 'मुन्ना भाई 3' पाहायला मिळेल, अशी आशा चाहत्यांना आहे.  2003 मध्ये 'मुन्ना भाई एमबीबीएस' आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं प्रेक्षकांना पार वेड करुन सोडलं होतं. त्यानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग 2006 मध्ये 'लगे रहो मुन्ना भाई' आला. त्यानेही प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन केलं होतं. आता तब्बल १६ वर्षांनी ही संजय दत्त आणि अर्शद वारसी ही जोडी पडद्यावर धम्माल करायला येत आहे.

शिवाय, वेलकम आणि वेलकम 2 चा बहुप्रतिक्षित सिक्वेल वेलकम टू द जंगल' या सिनेमातही अरशद वारसी आणि संजय दत्त पाहायला मिळणार आहेत.  वेलकम टू द जंगल मध्ये अक्षय कुमार, परेश रावल, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर असे कलाकार दिसणार आहेत.

 

 

Web Title: Munna aka Sanjay Dutt reunites with Circuit aka Arshad Warsi with rajkumar hirani for Munnabhai 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.