मुंबईत मोडेल्सच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 12:36 IST2016-07-15T07:05:22+5:302016-07-15T12:36:40+5:30
बॉयफ्रेंड सोबत झालेला वाद आणि खाजगी आयुष्यातील अडचणींमुळे आलेले नैराश्य यामुळे एका मॉडेलने अंधेरीत आत्महत्या केल्याची घटना अंधेरीत घडली. ...

मुंबईत मोडेल्सच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच
ब यफ्रेंड सोबत झालेला वाद आणि खाजगी आयुष्यातील अडचणींमुळे आलेले नैराश्य यामुळे एका मॉडेलने अंधेरीत आत्महत्या केल्याची घटना अंधेरीत घडली. बॉलिवूड मध्ये आपला स्टारडम वाढावा आणि चंदेरी दुनियेत नाव कमविण्याचे स्वप्न उराशी बाळगून बरेचजण मुंबईला येतात. मात्र सर्वांचेच स्वप्न पूर्ण होतं असं नाही. कित्येकांचा हा प्रवास तर अर्ध्यावरच थांबतो.
मॉडेल करमजीत कौर उर्फ नेहा बॉलिवूडमध्ये करीअर करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली. मात्र तिचे हे स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच तिला आत्महत्या करावी लागली. काल रात्री करमजीतने अंधेरीतल्या सहजीवन सोसायटीत पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
करमजीत तिचा प्रियकर दीपेंद्रसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. तिला दीपेंद्रसोबत लग्न करायचं होतं आणि याच कारणावरुन तिचं दीपेंद्रसोबत काल रात्री भांडण झालं. पण दीपेंद्र घराबाहेर गेल्यानंतर तिने स्वत:ला कोंडून घेतलं. त्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. करमजीतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी दीपेंद्रची देखील चौकशी सुरु केली आहे.
करमजीत अगोदर जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी या मॉडेल्सनेही आत्महत्या केली आहे. आणि आता करमजीत कौर. सिनेसृष्टी आणि छोट्या पडद्यावरची ही अशी नावं आहेत, जी मृत्यूनंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामुळं आयुष्यासाठी केवळ पैसा आणि प्रसिद्धीच नव्हे, तर खासगी आयुष्याची स्थिरताही गरजेची असते, हेच या घटनांवरुन लक्षात येतं.