‘रॉक आॅन 2’ च्या अँथम साँगमध्ये अशी दिसते मुंबई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 21:01 IST2016-10-19T21:01:27+5:302016-10-19T21:01:27+5:30
मुंबईला नव्या रूपात पाहायचे असेल तर ‘रॉक आॅन 2’च्या अँथम साँगमधून पाहता यते.

‘रॉक आॅन 2’ च्या अँथम साँगमध्ये अशी दिसते मुंबई
रॉक आनच्या या गाण्याला मुंबईच्या अशा लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे जेथे कधी रात्र होतच नाही. या गाण्यात व्हिक्टोरिया टर्मिनल्स, एअर इंडिया बिल्डिंग, गेट वे आॅफ इंडिया, बीएमसी इमारतीसह विविध ठिकाणी शूट करण्यात आले आहे. सामान्यत: या ठिकाणी गर्दी कधीच कमी झालेली पहायला मिळत नसल्याचे सांगण्यात येते. रॉक आॅन 2 चे हे अँथम साँग जुण्या रॉक आॅनच्या थीमसॉमवरच आधारित असले तरी यात श्रद्धा कपूरचा आवाज लक्ष वेधून घेणारा आहे. या गाण्याचे म्युझिक लाऊंड आहे. रॉक आॅन-2 चे गाणे रिलीझ झाल्यापासूनच हिट ठरली आहेत.
11 नोव्हेंबरला ‘रॉक आॅन 2 ’प्रदर्शित होत असून यात फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रॉक आॅन 2 ची शूटिंग भारताच्या पूर्वेकडील राज्यात करण्यात आली आहे. यापूर्वी कधीच या भागात शूटिंग क रण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. मात्र अँथम साँगमधून मुंबईचे दर्शन घडविण्याचे कारण तरी काय असावे हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
पण त्यापूर्वी रॉक आॅन 2 चे हे जबरदस्त गाणे पहाच...