विनाहेल्मेट बाइक चालविणाºया कुणाल खेमूला मुंबई पोलिसांचा दणका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 16:06 IST2018-03-21T10:35:59+5:302018-03-21T16:06:07+5:30

मुंबईच्या रस्त्यावर विनाहेल्मेट बाइक चालविणाºया अभिनेता कुणाल खेमूला मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी दंड वसुलीची पावती थेट कुणालच्या ...

Mumbai Police force Kunal Khemu to run a non-violent bike! | विनाहेल्मेट बाइक चालविणाºया कुणाल खेमूला मुंबई पोलिसांचा दणका!

विनाहेल्मेट बाइक चालविणाºया कुणाल खेमूला मुंबई पोलिसांचा दणका!

ंबईच्या रस्त्यावर विनाहेल्मेट बाइक चालविणाºया अभिनेता कुणाल खेमूला मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी दंड वसुलीची पावती थेट कुणालच्या घरी पाठविली, त्याचबरोबर पुन्हा अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करू नये म्हणून त्याला ताकीदही दिली. वास्तविक कुणालने या प्रकरणी ट्विट करून माफी मागितली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनीदेखील त्यांच्या आॅफिशियल अकाउंटवरून ट्विट करताना लिहिले की, ‘कुणाल खेमू तुला बाइक चालविणे आवडते, पण आम्हाला लोकांची सुरक्षा करणे महत्त्वाचे वाटते. त्याचबरोबर प्रत्येक दुघर्टना टाळता यावी हाच आमचा प्रयत्न असतो. अपेक्षा करतो की, पुन्हा अशाप्रकारची चुक तुझ्याकडून होऊ नये. एक ई-चलन तुला पाठविले आहे.’ 

दरम्यान, कुणाल खेमू मुंबईच्या रस्त्यावर विनाहेल्मेट बाइक चालविताना बघावयास मिळाला. यावेळी त्याने हेल्मेट न घालता व्हाइट कॅप घातली होती. अशा अवतारात बाइक चालवितानाचे त्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. जेव्हा हे फोटो समोर आले तेव्हा त्याने ट्विटच्या माध्यमातून माफी मागितली. त्याने लिहिले की, ‘मी हा फोटो बघितला आणि मला याबद्दल खूपच वाइट वाटत आहे. मला बाइक चालविणे खूप आवडते. मला नियमितपणे हेल्मेट घालून बाइक चालवायची आहे. मग लॉन्ग राइड असो वा काही अंतरावरून फेरफटका मारणे असो, मी हेल्मेट नियमितपणे घालणार.’ 
 }}}} ">I have seen this picture out there and honestly it’s very embarrassing given I love bikes and ride regularly and always with a helmet and some more gear but whether it’s a long ride or just next door a helmet should always be worn.apologies I don’t want to set the wrong example! pic.twitter.com/s8mDnmbTsv— kunal kemmu (@kunalkemmu) March 21, 2018
कुणालने पुढे माफी मागताना लिहिले की, ‘मी या चुकीसाठी माफी मागतो. मी लोकांसाठी चुकीचे उदाहरण बनू इच्छित नाही.’ दरम्यान, कुणाल अखेरीस ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात बघावयास मिळाला होता. सध्या कुणाल आपल्या फॅमिलीला वेळ देताना बघावयास मिळत आहे. 

Web Title: Mumbai Police force Kunal Khemu to run a non-violent bike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.