मुग्धा गोडसेने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पेट्रोल पंपावर केले होते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 05:35 AM2017-07-26T05:35:52+5:302017-07-26T11:05:52+5:30

फॅशन या चित्रपटाद्वारे मुग्धा गोडसेने बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. २६ जुलैला म्हणजेच आज ती तिचा ३१वा वाढदिवस साजरा ...

Before Mugdha Godse did on petrol pumps before coming to Bollywood | मुग्धा गोडसेने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पेट्रोल पंपावर केले होते काम

मुग्धा गोडसेने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पेट्रोल पंपावर केले होते काम

googlenewsNext
शन या चित्रपटाद्वारे मुग्धा गोडसेने बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. २६ जुलैला म्हणजेच आज ती तिचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊन तिच्याविषयी काही खास गोष्टी...
मुग्धा अतिशय सामान्य घरातून आली आहे. तिचे शिक्षण पुण्यात झाले असून तिने कॉमर्स मधून तिचे शिक्षण घेतले आहे. मुग्धाने एक मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. ती बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अतिशय प्रसिद्ध मॉडेल होती. तिने ग्लॅडरस मेगा मॉडेल हंट जिंकले होते. याच स्पर्धेमुळे ती प्रकाशझोतात आली. तिने फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सेमी-फायनलपर्यंत देखील मजल मारली होती. मुग्धाने मॉडलिंगमध्ये करिअर करण्याआधी ती एका वेगळ्याच क्षेत्रात होती.

mugdha godse

खूपच कमी जणांना माहीत आहे की, मुग्धाने या क्षेत्रात येण्यापूर्वी पेट्रोल पंपावर देखील काम केले आहे. तिथे तिला दिवसाला केवळ 100 रुपये मिळत असे. पण तरीही तिने हे काम अनेक दिवस आनंदाने केले. 

mugdha godse


मुग्धा मुळची पुण्याची असली तरी मॉडलिंग या क्षेत्रात करियर करण्यासाठी ती मुंबईत शिफ्ट झाली. फॅशन या तिच्या पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंत ती ऑल द बेस्ट, जेल, हिरोईन, यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. 

mugdha godse

मुग्धा गोडसे आणि राहुल देव गेल्या अनेक महिन्यांपासून नात्यात आहेत. राहुल देवचे पहिले लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे. राहुलचे पहिले लग्न रिनासोबत झाले होते. रिनाचे 2009मध्ये कर्करोगाने निधन झाले. मुग्धा आणि राहुल पॉवर कपल या कार्यक्रमात देखील झळकले होते. 

rahul dev mugdha godse

Web Title: Before Mugdha Godse did on petrol pumps before coming to Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.