भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक असलेला ‘एम.एस.धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा पहिला डायलॉग प्रोमो रिलीज करण्यात ...
‘एम.एस. धोनी ’चा फर्स्ट डायलॉग प्रोमो रिलीज
/>भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक असलेला ‘एम.एस.धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा पहिला डायलॉग प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात धोनीची भूमिका सुशांत सिंह राजपूत साकारत आहे. हा प्रोमो रिलीज झाल्याचे सुशांतने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहे. याअगोदर चित्रपटाचा ट्रेलर व गाणे ‘जब तक’ व ’फिर कभी’ हे रिलीज झालेले आहे. यामध्ये अनुपम खैर हा धोनीच्या वडिलांची तर कियारा अडवाणी धोनीची पत्नी साक्षीची भूमिका साकारत आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत असून, त्याचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे.