​‘ढिश्शूम’मध्ये सर्वात महागडा चेसिंग सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 12:24 IST2016-06-30T06:54:21+5:302016-06-30T12:24:21+5:30

जॉन-वरुण-जॅकलिन स्टारर ‘ढिश्शूम’चे ट्रेलर पाहून चित्रपटाचा आशय आणि आवाका लक्षात येतो. दुबई, मोरोक्को येथील डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लोकेशन्सवर चित्रित ...

The most expensive chessing scene in Dhishzum | ​‘ढिश्शूम’मध्ये सर्वात महागडा चेसिंग सीन

​‘ढिश्शूम’मध्ये सर्वात महागडा चेसिंग सीन

न-वरुण-जॅकलिन स्टारर ‘ढिश्शूम’चे ट्रेलर पाहून चित्रपटाचा आशय आणि आवाका लक्षात येतो.

दुबई, मोरोक्को येथील डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लोकेशन्सवर चित्रित झालेले अ‍ॅक्शन सीन्स पाहून आवक व्हायला होते. चित्रपटात असणारा चेसिंग सीन बॉलीवूडमधील सर्वात महागडा सीन असल्याची सध्या चर्चा आहे.

हॉट व्हील्स, स्पीडबोट आणि हेलिकॉप्टरचा सामावेश असलेल्या हा सीनमध्ये जमीन, पाणी आणि हवेत अ‍ॅक्शन करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या जवळील सुत्राने सांगितले की, आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अशा प्रकारचा सर्वात लांब (बारा मिनिटे) आणि अत्यंत क्लिष्ट असा सीन प्रथमच शुट करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्टंटमेन, प्रशिक्षित फायटर्स व स्वत: जॉन आणि वरुणने यामध्ये स्टंट केले आहेत. अनेक चॉपर्सच्या मदतीने हेलिकॉप्टर सीन्सस चित्रित करण्यात आले. कदाचित बॉलीवूडमधील हा सर्वात महागडा चेसिंग सिक्वेन्स असू शकतो. 

यावेळी सर्वांच्या सुरक्षेची अत्यंत चोख काळजी घेण्यात आली होती. आता त्यांची एवढी मेहनत प्रेक्षकांना कितपत भावते हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Web Title: The most expensive chessing scene in Dhishzum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.